Youth Suicide for Maratha Reservation: स्मिता शिंदे, पुणे: मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange-Patil) यांनी आपलं आमरण उपोषण दोन दिवसांपूर्वीच मागे घेतलं. आरक्षणासाठी शिंदे सरकारने दोन महिन्यांचा वेळ मागून घेत जरांगे पाटील यांना उपोषण सोडण्याची मागणी केली होती. जी जरांगेंनी देखील मान्य केली. असं असता दुसरीकडे पुण्यातील (Pune) खेडमध्ये मराठा आरक्षण अद्यापही न मिळाल्याने अवघ्या 22 वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सिद्धेश सत्यवान बर्गे असे आत्महत्या केलेल्या 22 वर्षीय तरुणाचे नाव आहे. (22 year old youth commits suicide to get reservation for maratha community suicide note came in front shinde govt)
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या खेड तालुक्यातील चिंबळी येथील सिद्धेश सत्यवान बर्गे या तरुणाने आत्महत्या करत मराठा आरक्षणासाठी आपलं आयुष्य संपवल आहे. सिद्धेश हा चिंबळी येथे व्यवसाय करत असलेल्या ठिकाणी त्याने गळफास घेतला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आत्महत्या करत असल्याची सुसाइड नोट लिहीत त्याने आपलं जीवन संपवलं.
हे ही वाचा>> Manoj Jarange: CM शिंदे एकटे पडले, लढले अन् जिंकले… जरांगेंसोबतच्या ‘त्या’ फोन कॉलची Inside Story
‘ह्या सरकारच्या कार्यपद्धतीला कंटाळून जीव देतोय..’, ‘ती’ सुसाईड नोट जशीच्या तशी..
दरम्यान, ही घटना उघडकीस आल्यानंतर सिद्धेशने आत्महत्येपूर्वी लिहलेली सुसाईड नोट देखील आता सापडली आहे. ज्यामध्ये सिद्धेशने लिहलं आहे की, मराठा आरक्षणाबाबत ह्या सरकारच्या कार्यपद्धतीला कंटाळून आपण आत्महत्या करत आहोत.
‘मी माझा जीव कोणाच्या त्रासाला कंटाळून दिला नाहीए, ह्या सरकारच्या कार्यपद्धतीला कंटाळून दिला आहे. मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे. ही माझी इच्छा आहे.. त्यामुळे मी माझा जीव देत आहे. कोणीही कोणाला दोष देऊ नये, मी मराठा बांधवांसाठी हे पाऊल उचलत आहे.’
‘फक्त्त माझ्या सोन्या, अप्पा, जीजी, आईला सांभाळा..’ अशी सुसाईड नोट सिद्धेशने लिहिली आहे.
मनोज जरांगेंनी तरुणांना केलंय आत्महत्या न करण्याचं आवाहन…
दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी सरकारला दोन महिन्यांचा वेळ दिल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण सोडलं. पण याचवेळी मराठा तरुणांनी कोणत्याही प्रकारे टोकाचं पाऊल उचलून आत्महत्या न करण्याचं आवाहन जरांगे-पाटलांनी केलं होतं. शांततेच्या मार्गाने आरक्षण मिळविण्यासाठी सरकारसोबत लढण्याचं आवाहन देखील जरांगे यांनी केलं होतं.
हे ही वाचा>> Fact Check: पुण्यातील भांडारकर इन्स्टिट्यूटवर हल्ला करणाऱ्यांमध्ये मनोज जरांगे होते का?
मात्र, असं असताना देखील तरुणाने आरक्षणासाठी आत्महत्या केल्याचं आता समोर आल्याने एकच खळबळ माजली आहे. तसेच या घटनेमुळे मराठा तरुणांमधील अस्वस्थता देखील समोर आली आहे.
ADVERTISEMENT