Maharashtra Weather : दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये वादळ धडकणार! 'या' ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळणार

Maharashtra Weather Today : मागील काही दिवसांपासून राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये उकाडा वाढल्याचं पाहायला मिळालं. काही जिल्ह्यांत उष्ण व दमट हवामानाची नोंदही करण्यात आली.

Maharashtra Weather Today (Photo -AI)

Maharashtra Weather Today (Photo -AI)

मुंबई तक

25 Mar 2025 (अपडेटेड: 25 Mar 2025, 10:14 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

कोणत्या जिल्ह्यात असेल कोरडं हवामान?

point

या जिल्ह्यात असणार उष्ण आणि दमट हवामान

point

आजच्या हवामानाबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती

Maharashtra Weather Today : मागील काही दिवसांपासून राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये उकाडा वाढल्याचं पाहायला मिळालं. काही जिल्ह्यांत उष्ण व दमट हवामानाची नोंदही करण्यात आली. काल सोमवारी 23 मार्चला मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये धुकं पसरणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला होता. तसच 23  मार्चला मराठवाड्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि हलक्या पाऊस पडण्याचा अंदाजही हवामान विभागाने बांधला होता.

हे वाचलं का?

दरम्यान, राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आजची हवामानाची स्थिती कशी असेल? याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. 

हे ही वाचा >> Prashant Koratkar : फरार प्रशांत कोरटकरला पोलिसांनी कसं केलं अटक? वाचा Inside Story

आज कसं असेल संपूर्ण राज्यात हवामान?

राज्यात पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट परिसर, कोल्हापूर, कोल्हापूर घाट परिसर, सातारा, सातारा घाट परिसर, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळमध्ये कोरडं हवामान राहणार आहे, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. 

मार्च महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णता वाढल्याचं चित्र होतं. पहिल्या आठवड्यात तापमानाचा पारा 40 अंश सेल्सियसवर पोहोचला होता. अनेक ठिकाणी उष्णता खूपच वाढल्याने हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याच्या आणि घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळत असल्याने वातावरणात गारवा पसरला आहे. 

हे ही वाचा >> VIDEO: शिंदे गटाचा आपसातच राडा, महिलेने शिंदेंच्या माजी नगरसेवकाला भर रस्त्यात बेदम चोपलं!

    follow whatsapp