Maharashtra Weather Today: रत्नागिरी, सिंधुदुर्गात पावसाची शक्यता, तुमच्या जिल्ह्यात कसं आहे वातावरण?

Maharashtra Weather 26th Mar 2025: दक्षिण कोकणातील आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पाहा आजचा हवामानाचा अंदाज.

Maharashtra Weather Today (फोटो सौजन्य: Grok AI)

Maharashtra Weather Today (फोटो सौजन्य: Grok AI)

मुंबई तक

26 Mar 2025 (अपडेटेड: 26 Mar 2025, 10:29 AM)

follow google news

Maharashtra Weather: मुंबई: महाराष्ट्रात अनेक भागात आता उन्हाचा तडाखा वाढता असला तरी ढगाळ वातावरण, सोसाट्याचा वारा आणि वादळी पावसाची शक्यता देखील काही जिल्ह्यांमध्ये वर्तवण्यात आली आहे. दक्षिण भारतात होणाऱ्या पावसामुळे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांवर पावसाचं सावट असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

हे वाचलं का?

दक्षिण कोकणातील आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक  ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह ताशी 30-40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हे ही वाचा>> 25 March 2025 Gold Rate: मस्तच.. सोने पुन्हा झालं स्वस्त, आठवड्याच्या दुसऱ्या दिवशीही सोनं गडगडलं

हवामान विभागाने काय वर्तवलाय अंदाज?

फोटो सौजन्य: Grok AI

25 तारखेसाठी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट म्हणजेच पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. तर 26 तारखेला विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आणि मराठवाड्यात ढगाळ वातारवरण, त्याचबरोबर काही भागात 40 अंश डिग्री सेल्सियसच्यावर पारा जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 

हे ही वाचा>> Pune: भयंकर... बरण्यांमध्ये सापडले 6-7 अर्भक, अवघं पुणं हादरलं; नेमकी घटना काय?

28 तारखेपर्यंत हवामानात मोठा बदल जाणवणार नसून 29 तारखेपासून अनेक जिल्ह्यात पुन्हा पाऊस सक्रिय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. 
24 तारखेला अकोला 40 तर वर्धा, जळगाव, बीड, अमरावती जिल्हयांत 39 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती.

त्यामळे उन्हाचा पारा एकीकडे वाढतोय तर ढगाळ वातावरणामुळे विदर्भ, मध्य महाराष्ट्रात पावसाचीही भीती वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी हवामान खात्याने स्थानिक अंदाज देखील वर्तवला आहे. त्यानुसार मुंबई  शहर आणि उपनगरात आकाश मुख्यतः निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 34°C आणि 23°C च्या आसपास असेल.

    follow whatsapp