Today Gold And Silver Price Rate : आज रविवारी 29 सप्टेंबरला देशातील प्रमुख शहरांत 24 कॅरेट सोन्याची प्रति 10 ग्रॅमची किंमत 77000 रुपयांच्या जवळपास आहे. मागील एक आठवड्यात सोन्याचे भाव 1470 रुपयांनी वाढला आहे. राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 77550 रुपये आहे. आठवडाभरात चांदीची किंमतही 2000 रुपयांनी वाढली आहे. सध्या चांदीची एक किलोग्रॅमची किंमत 95000 रुपये इतकी आहे. देशातील 15 मोठ्या शहरात 22 आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत किती रुपयांनी वाढली आहे, जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती. (Today, Sunday, 29th September, the price of 24 carat gold per 10 grams in major cities of the country is around Rs 77000. In the last one week, the price of gold has increased by Rs 1470)
ADVERTISEMENT
दिल्ली, नोएडा आणि गुरुग्राममध्ये सोन्याचा भाव
दिल्लीत 22 कॅरेट सोन्याची प्रति 10 ग्रॅमची किंमत 71,100 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत जवळपास 77,550 रुपये इतकी आहे.
लखनऊ
लखनऊमध्ये 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमची किंमत 77,550 रुपये आहे. तर 22 कॅरेटच्या सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 71000 रुपयांवर पोहोचला आहे.
कोलकाता
कोलकातामध्ये 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 77400 रुपयांवर पोहोचला आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 70950 रुपयांवर पोहोचला आहे.
हे ही वाचा >> Vidhansabha Election 2024 : ठरलं! विधानसभेत मनसेचा झेंडा फडकणार? 'इतक्या' जागांवर लढणार निवडणूक
जयपूर
जयपूरमध्ये 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमची किंमत 77550 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 71100 रुपये इतकी आहे.
पटना
पटनामध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 77450 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 71000 रुपये आहे.
भुवनेश्वर आणि हैदराबाद
या दोन्ही शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 77400 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 70950 रुपये इतका आहे.
हे ही वाचा >> Horoscope In Marathi: कुणा कुणाचा बँक बॅलेन्स वाढणार? 'या' राशींवर पडेल पैशांचा पाऊस, तुमचं भविष्य काय?
अहमदाबाद
अहमदाबादमध्ये 22 कॅरेट सोन्याची प्रति 10 ग्रॅंमची रिटेल किंमत 71000 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 77450 रुपये आहे.
चेन्नई आणि बंगळुरुत सोन्याची किंमत
चेन्नई आणि बंगळुरुत 24 कॅरेटच्या प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत 77400 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 70,950 रुपये आहे.
सोन्याची शुद्धता प्रामुख्याने कॅरेट (K) मध्ये मोजली जाते. दागिन्यांच्या तुकड्यामध्ये किंवा सोन्याच्या वस्तूमध्ये किती शुद्ध सोने समाविष्ट आहे हे कॅरेट प्रणाली दर्शवते. भारतातील सर्वात लोकप्रिय कॅरेट मूल्ये 24, 22, 18 आणि 14 आहेत. शुद्ध सोने 24k मानले जाते, ज्यामध्ये 99.9% सोने असते, तर उर्वरित कॅरेटमध्ये तांबे किंवा चांदीसारख्या मिश्र धातुंचा समावेश होतो.
ADVERTISEMENT