Gold Rate Today In India: सोनं-चांदी खरेदी करण्यासाठी आनंदाची बातमी समोर आलीय. काल म्हणजेच 2 डिसेंबर 2024 च्या तुलनेत आज (3 डिसेंबर 2024) ला सोनं-चांदीच्या बुलियन प्राईजमध्ये घसरण झालीय. परंतु, मागील पाच दिवसांच्या तुलनेत आताचा भाव 1.6 टक्के जास्त आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव 1 टक्क्यांनी कमी झाले आहेत.
ADVERTISEMENT
सोनं-चांदीचा आजचा भाव काय?
आज 3 डिसेंबरला भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा भाव 76540 रुपये झाला आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा भाव 70162 रुपये झाला आहे. मागील एक आठवड्यात 24 कॅरेट सोन्याचा भाव 1.6 टक्क्यांनी वाढला आहे. तर मागील 10 दिवसांमध्ये सोन्याच्या भावात 1.7 टक्क्यांनी वाढ झालीय. भारतीय ग्राहकांसाठी आज चांदी प्रति किलोग्रॅम 90490 रुपये झाली आहे.
मुंबईत आज सोन्याचा भाव
आज मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा भाव 76540 रुपयांवर पोहोचला आहे. तर 2 डिसेंबरला सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा भाव 77020 रुपये होता. तसच एक आठवडा आधी म्हणजेच 26 नोव्हेंबरला सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा भाव 75280 रुपये होता.
हे ही वाचा >> Mumbai Weather Update: मुंबईच्या हवामानाने नागरिकांची वाढवली चिंता! आजचं तापमान वाचून हुडहुडीच भरेल
मुंबईत आज चांदीचा भाव
मुंबईत आज चांदीचे दर प्रति किलोग्रॅम 90490 रुपयांवर पोहोचले आहेत. तर काल 2 डिसेंबरला चांदीचा भाव प्रति किलोग्रॅम 90820 रुपये होता. तर मागील एक आठवड्यापूर्वी चांदीचा भाव प्रति किलोग्रॅम 88060 रुपये होता.
दिल्लीत आज सोन्याचा भाव
दिल्लीत आज सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा भाव 76410 रुपये आहे. तर 2 डिसेंबरला सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा भाव 76880 रुपये होता. तर मागील आठवड्यात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा भाव 75150 रुपये होता.
हे ही वाचा >> Maharashtra Markadwadi News Live : "एक जरी मत दिलं, तर...", पोलिसांनी मारकडवाडीच्या ग्रामस्थांना दिला इशारा
दिल्लीत आजचा चांदीचा भाव
दिल्लीत आज चांदीचे दर प्रति किलोग्रॅम 90330 रुपयांवर पोहोचले आहेत. तर काल 2 डिसेंबरला चांदीचा भाव प्रति किलोग्रॅम 90660 रुपये होता. तर मागील एक आठवड्यापूर्वी चांदीचा भाव प्रति किलोग्रॅम 87900 रुपये होता.
ADVERTISEMENT