मुंबई: मुंबईतील प्रसिद्ध लीलावती रुग्णालयाच्या विश्वस्तांनी दावा केला आहे की रुग्णालयाच्या परिसरात काळ्या जादूचे विधी केले जात असल्याचे पुरावे सापडले आहेत. त्यांच्या मते, सध्याच्या विश्वस्त कार्यालय असलेल्या जमिनीखाली मानवी हाडे, कवट्या, केस, तांदूळ आणि तांत्रिक पद्धतींशी संबंधित इतर वस्तू असलेले आठ कलश सापडले आहेत. गेल्या काही दिवसांपासून लीलावती रुग्णालयाचे विश्वस्त निधीच्या गैरवापराच्या कथित प्रकरणामुळे चर्चेत आहेत.
ADVERTISEMENT
एका माजी कर्मचाऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे या गोष्टी सापडल्या आणि उत्खननादरम्यान एक व्हिडिओ देखील बनवण्यात आला. हॉस्पिटल ट्रस्टने त्यांच्या माजी विश्वस्तांवर बनावट ऑर्डर आणि रेकॉर्डद्वारे पैसे उकळल्याचा आरोप करत 1250 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या गैरव्यवहाराचा खटला दाखल केल्यानंतर हे घडले आहे. तथापि, माजी विश्वस्तांनी हे आरोप निराधार आणि द्वेषपूर्ण असल्याचे सांगत फेटाळून लावले.
हे ही वाचा>> Honeymoon साठी बेडरुममध्ये गेल्यावरच प्रदीपच्या मोबाइलवर 'तो' मेसेज, अन् दोघांचा मृत्यू...
लीलावती रुग्णालयाचे संस्थापक किशोर मेहता यांचे भाऊ विजय मेहता, त्यांचे नातेवाईक आणि सहकाऱ्यांविरुद्ध आर्थिक अनियमिततेप्रकरणी तीन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. याशिवाय, माजी विश्वस्तांविरुद्ध कर चोरीच्या तक्रारी देखील दाखल करण्यात आल्या होत्या.
या घोटाळ्याची चौकशी व्हावी म्हणून विद्यमान विश्वस्तांनी अंमलबजावणी संचालनालयाकडे तक्रार केली आहे. माजी विश्वस्त युएई आणि बेल्जियममध्ये गेले आहेत असे वृत्त आहे.
अहवालात सापडले पुरावे
दरम्यान, महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत एक तक्रार दाखल करण्यात आली. ज्यामध्ये रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी प्रशांत मेहता आणि त्यांची आई चारू मेहता यांना इजा करण्यासाठी माजी विश्वस्तांकडून काळी जादू केल्याचा आरोप असल्याचे म्हटले आहे.
हे ही वाचा>> संतोष देशमुखांच्या हत्येचा जिथे कट रचला, तिथल्या प्रत्यक्षदर्शीचा जबाब आला समोर, वाचून तुम्हीही जाल हादरून!
तथापि, विजय मेहता यांचा मुलगा चेतन मेहता याने काळ्या जादूच्या आरोपांचे खंडन केले आहे. ते म्हणाले, 'काळ्या जादूचे आरोप उत्तर देण्यासारखेही नाहीत आणि ते फक्त खळबळ निर्माण करण्यासाठी आहेत.'
अधिकाऱ्यांच्या मते, किशोर मेहता 2002 साली उपचारासाठी परदेशात गेले होते. या काळात त्यांचे भाऊ विजय मेहता यांनी ट्रस्टचा तात्पुरता कारभार स्वीकारला होतचा. विजय मेहता यांनी त्यांच्या मुलांना आणि पुतण्यांना विश्वस्त म्हणून नियुक्त करण्यासाठी बनावट कागदपत्रे आणि सह्या केल्याचा आरोप आहे, तर किशोर मेहता यांना कायमस्वरूपी विश्वस्त पदावरून काढून टाकले. पण दीर्घ कायदेशीर लढाईनंतर, किशोर मेहता यांना 2016 मध्ये त्यांचे पद परत मिळाले.
फॉरेन्सिक ऑडिटमध्ये अनियमितता उघडकीस
2024 मध्ये किशोर मेहता यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा प्रशांत मेहता कायमचा विश्वस्त झाला. प्रशांतने खात्यांचे फॉरेन्सिक ऑडिट केले, ज्यामध्ये बनावट ऑर्डर आणि रेकॉर्डद्वारे पैशांचा अपहार करण्यासह अनेक मोठ्या आर्थिक अनियमितता उघडकीस आल्या. रुग्णालयाच्या आर्थिक नोंदींचे अलिकडेच झालेल्या फॉरेन्सिक ऑडिटनंतर हा मोठा घोटाळा उघडकीस आला.
ADVERTISEMENT
