कृष्णा पांचाळ, पिंपरी-चिंचवड, पुणे: पुण्यातील (Pune) तळेगावमध्ये जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांच्या खुनाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांच्यावर खुनाचा कट रचल्याप्रकरणी तळेगाव पोलीस ठाण्यात त्यांच्या भावासह एकूण सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुनाप्रकरणी आत्तापर्यंत चार आरोपींना तळेगाव पोलिसांनी अटक केली आहे. रघू धोत्रे, आदेश धोत्रे, श्याम निगडकर आणि संदीप मोरे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना 20 मे पर्यंत वडगाव मावळ न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शुक्रवारी भर दिवसा किशोर आवारे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. तसेच त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी वार देखील करण्यात आले होते. किशोर आवारे यांच्या आई सुलोचना आवारे यांनी पोलिसात तक्रार दिली असून त्यात आमदार सुनील शेळके यांच्या नावाचा देखील समावेश आहे.
ADVERTISEMENT
आमदार सुनील शेळके यांची प्रेस कॉन्फरन्स…
आमदार सुनील शेळके यांनी आज (शनिवारी) प्रेस कॉन्फरन्स घेऊन हे सर्व आरोप खोडून काढले आहेत. उलट पोलिसांनी योग्य तो तपास करून आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी असा प्रयत्न करावा. असं आवाहन त्यांनी केलं आहे. पोलिसांना तपासात मी पूर्ण सहकार्य करत आहे असं देखील शेळके यांनी म्हटलं आहे. तसेच या खुनाप्रकरणी कुठलंही राजकारण करू नये. असे देखील त्यांनी स्थानिक राजकारणातील व्यक्तींना आवाहन केल आहे. मला आणि माझ्या भावाला या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला जातो आहे.
हे ही वाचा >> Ulhasnagar : मासिक पाळीचं रक्त पाहून खवळला अन् भावाने 12 वर्षाच्या बहिणीला संपवलं!
धारदार शस्त्राने अठरा वार करून केला खून….
शुक्रवारी जनसेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची तळेगावच्या नगरपरिषदेसमोरच धारदार शस्त्राने वार करून आणि गोळ्या झाडून चार जणांनी हत्या केली होती. याप्रकरणी पोलिसांनी काही तासातच मुख्य चार आरोपींना अटक केली आहे. दरम्यान, खून करून पळ काढणारे आरोपी सीसीटीव्हीत कैद झाले होते. गोळ्या झाडल्यानंतर खाली पडलेल्या किशोर आवारे यांच्यावर कोयत्याने 18 वार करण्यात आल्याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
हे ही वाचा >> Husband-Wife: ‘नवऱ्याने बेडरूममध्ये लावलाय CCTV कॅमेरा’, बायको म्हणाली; त्याला…
नागरिकांच्या समोरच खून झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण
किशोर आवरे हे तळेगावच्या नगरपरिषदेतून बाहेर पडताच दबा धरून बसलेल्या चार जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. एकाने पाठीत आणि पोटात गोळ्या झाडल्या, तर खाली पडताच आवारे यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. हे सर्व तेथे उपस्थित असलेले नागरिक डोळ्यांनी बघत होते. या घटनेमुळे परिसरातील नागरिक ही भीतीच्या सावटाखाली आहेत.
ADVERTISEMENT