सातारा: साताऱ्यातील (Satara) पुसेसावळी गावात दहा सप्टेंबर रोजी झालेल्या धार्मिक स्थळावरील हल्ल्यामध्ये एक व्यक्तीचा मृत्यू झाला होता. नुरल हसन शिकलगार (वय 30 वर्ष) असं त्याचं नाव आहे. नुरलसोबत आणखी काही नागरिकांना बेदम मारहाण करण्यात आली. ज्यामध्ये 14 जण गंभीर जखमी झाले. या घटनेला आता आठ दिवस उलटले. मात्र आजही गावात एका समाजात भीतीचे वातावरण कायम आहे. गाव पूर्वपदावर आलं आहे. मात्र, नुरल हसनच्या परिवारावर झालेला जखमा आजही ताज्या आहेत. (a young man nural hasan of pusesawali satara was killed in an attack by some miscreants family expressed strong anger)
ADVERTISEMENT
हसनचा परिवार अद्यापही त्या धक्क्यामधून बाहेर आलेला नाही. पत्नी आयेशा नूर हसन शिकलगार ही पेशाने वकील तर वडील लियाकत शिकलगार कोल्हापूरमध्ये मौलवी म्हणून काम करतात. तर आई रिटायर्ड आरोग्य विभागाची नर्स होती. दंगलीमध्ये मृत झालेला नूर हसन हा सिविल इंजिनियर होता. मात्र घराची परिस्थिती अत्यंत हलाखीची म्हणून वडील मौलवी व घरातला एकुलता एक करता धरता नूर हसन आपल्या घरी पशुधन सांभाळत छोट्या-मोठे काम करत आपलं कुटुंबाचा चरितार्थ चालवत होता.
अवघा एक वर्षाचं कालावधी पूर्वी नूर हसनचं लग्न झालं होतं. मात्र दंगलीत आपला पती मारला जाईल याचा तिने कधी स्वप्नात देखील विचार केला नव्हता.
हे ही वाचा >> Sanatan Controversy : सनातन धर्मावरून वाद पेटला, बाबा रामदेव भडकले; ‘सनातनला शिव्या…’
महापुरुषाबाबत पोस्ट कुणी दुसऱ्याने केली मात्र त्याचा फटका नूर हसनला बसला. जीवनीशी गेलेला नूर हसन व दंगलीत होरपळलेलं शिकलगार कुटुंबीयांना आता वाली कोण? असा सवाल देखील या घटनेनंतर उपस्थित झाला आहे.
घटना घडून आठ दिवस झाले तरी एकही राजकीय नेता अथवा कोणतीही सामाजिक संघटना या परिवाराचे हाल विचारण्यासाठी देखील गेले नाही. राजकीय पोळ्या भाजणाऱ्या राजकीय नेत्यांना आगामी काळात भलेही ही दंगल एका राजकीय मुद्द्यासाठी फायदेशीर ठरेल अथवा तोट्याची ठरेल याबाबत शंका असली तरी मात्र ज्याचं घर जळालं त्यालाच त्याच्या यातना समजतील.
हे ही वाचा >> Reservation: ‘OBC आरक्षणात नवीन वाटेकरी येऊ देणार नाही’, फडणवीसांचं मोठं विधान
नुरल हसनचं कुटुंबीयांच्या डोळ्यात आजही अश्रू तरळत आहेत. ‘काय चूक होती आमच्या मुलाची?, मशिदीत घुसून त्याचा खून केला इतकी क्रूरता का, काय दोष होता आमच्या मुलाचा? पोस्ट केली दुसऱ्याने अन् जीव गेला आमच्या मुलाचा…’ असं म्हणत नुरल हसनच्या कुटुंबीय व त्याची पत्नी सारखा हंबरडा फोडत आहे.
पुसेसावळी गावात गुण्यागोविंदाने राहणार हिंदू-मुस्लिम समाजाचे ऐक्य हे संपूर्ण सातारा जिल्ह्यात परिचित होतं. एकमेकाच्या सणांमध्ये सहभागी होणारे कुटुंबीय अशी येथील लोकांची ओळख होती. पण समाजकंटकांनी घातलेला हा घाव आज पुसेसावळीच नव्हे तर अवघ्या साताऱ्याला बसला आहे. आता याला नेमकं जबाबदार कोण?
ADVERTISEMENT