Aanvi Kamdar Death: Video शूट करता-करताच गेला मुंबईच्या तरुणीचा जीव, तिथे गेली अन्...

मुंबई तक

18 Jul 2024 (अपडेटेड: 18 Jul 2024, 05:27 PM)

Aanvi Kamdar News: रायगड जिल्ह्यातील कुंभे धबधबा येथील 300 फूट दरीत कोसळून अन्वी कामदार या 27 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जाणून घ्या नेमकं काय घडलं.

इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर अन्वी कामदारचा 300 फूट दरीत कोसळून मृत्यू

इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर अन्वी कामदारचा 300 फूट दरीत कोसळून मृत्यू

follow google news

बातम्या हायलाइट

point

रील्सच्या नादात अन्वी कामदारने गमावला जीव

point

रील बनवताना पाय घसरला अन् 300 फूट खोल दरीत कोसळली

point

माणगावच्या कुंभे धबधबा येथे घडली दुर्दैवी घटना

Aanvi Kamdar Death News माणगाव (रायगड): आजच्या तरुणांमध्ये सोशल मीडियावर (Social Media) रील्स (Reels) बनवण्याची क्रेझ इतकी आहे की ते जोखीम पत्करायला मागेपुढे पाहत नाहीत. रील्स किंवा व्हिडिओ बनवताना अनेक वेळा अपघात होतात. अशीच एक घटना रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये घडली आहे. ज्यामध्ये 27 वर्षीय तरुणीला आपला जीव गमावावा लागला. इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर असलेली अन्वी कामदार (Instagram influencer Anvi Kamdar) ही माणगाव येथील कुंभे धबधब्यावर गेली होती. तिथेच रिल शूट करताना तिचा तोल जाऊन ती थेट 300 फूट खोल दरीत कोसळली. ज्यामध्ये तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. (aanvi kamdar 27 year old influencer was making instagram reel died after falling into 300 feet deep ditch at kumbhe waterfall mangaon raigad)

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, माणगाव तालुक्यातील कुंभे धबधबा येथे ही घटना घडली. येथे अन्वी कामदार ही तरुणी मुंबईहून मित्र-मैत्रिणींसोबत रील बनवण्यासाठी आली होती. कुंभे धबधबा हे एक नैसर्गिक ठिकाण आहे, जेथे मोठ्या संख्येने लोक सहलीसाठी येतात.

हे ही वाचा>> Raigad Fort: रायगडावर असं का घडलं?, ही दृश्य पाहून तुम्हीही हादरून जाल!

अन्वी ही व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट (CA) आणि प्रसिद्ध इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर अन्वी कामदार हिचे सोशल मीडियावर 3 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

नेमकी घटना काय?

अन्वी ही जेव्हा कुंभे धबधब्यावर पोहोचली आणि तिथे रिल्स शूट करून लागली. याचवेळी या उंच पठारावर तुफान पाऊस सुरू होता. जिथे अत्यंत चिंचोळ्या वाटेवरून जात अन्वीने त्याचं टोक गाठलं. संपूर्ण निसरड्या झालेल्या या वाटेवर उभं राहून अन्वी रिल्स शूट करत होती. पण त्याचवेळी अचानक तिचा तोल गेला आणि ती थेट 300 फूट खोल दरीत कोसळली.

यावेळी अन्वीसोबत आलेल्या मित्र-मैत्रिणींनी तत्काळ पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. ही माहिती मिळताच माणगाव आणि कोलाड भागातील अनेक बचाव पथकं आणि पोलिसांचे पथक हे घटनास्थळी पोहोचले.

हे ही वाचा>> Dombivli VIDEO: चेष्टा सुरू असतानाच गेला जीव, तरुणाचा हात लागला अन् महिला एका झटक्यात...

ज्यानंतर अन्वीला बाहेर काढण्यासाठी अत्यंत कठीण असं बचाव कार्य सुरू झालं. मुसळधार कोसळणारा पाऊस, निसरडी वाट आणि खोल दरी असं तिहेरी आव्हान असताना देखील बचाव पथकातील तरुणांनी कुंभे धबधब्यातील 300 फूट खोल दरीत उतरून अन्वीला बाहेर काढलं. बचाव पथक जेव्हा खाली पोहचलं तेव्हा अन्वीची काहीशी हालचाल सुरू होती. त्यावेळी अत्यंत बिकट परिस्थिती आणि नैसर्गिक अडचणी यांचा सामना करत बचाव पथकाने अन्वीला तब्बल सहा तासाच्या अथक प्रयत्नानंतर वर आणलं. मात्र, दुर्दैवाने उपचाराअभावी तिचा मृत्यू झाला.

27 वर्षीय अन्वी ही तिच्या इंस्टाग्रामवर पेजवर प्रवासाशी संबंधित फोटो-रील्स शेअर करत असे. माणगाव पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की अन्वी ही मुलुंड, मुंबईची रहिवासी होती. पावसात ती मैत्रिणींसोबत धबधब्यापर्यंत आली होती. यावेळी आजूबाजूचे सुंदर दृश्य व्हिडिओमध्ये टिपत असताना अचानक तिचा पाय घसरला आणि ती थेट दरीत कोसळली. 

पोलिस निरीक्षक माणगाव निवृत्ती बोराडे यांनी यावेळी तरुणांना आवाहन केलं की,  त्यांनी निसर्गाचा आनंद घ्यावा पण रिल्स बनवण्याच्या नादात स्वत:चा जीव धोक्यात घालू नका असं आवाहन देखील केलं. दरम्यान, आता माणगाव पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे.

 

    follow whatsapp