Jamie Dornan : ‘फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे’ या हॉलिवूड चित्रपटातून जगभरात प्रसिद्धी मिळवणारा अभिनेता जेमी डोरनन सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. कारण अचानक त्याची तब्बेत बिघडल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. कारण पोर्तुगालच्या प्रवासावेळी जेमीला विषारी किड्याचा स्पर्श झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याला आता हृदयविकाराचा झटकाही (Heart Attack) आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याची प्रकृती खालावल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सरु करण्यात आले आहेत. या घटनेची माहिती जेमी डोर्ननचा मित्र गॉर्डन स्मार्टने दिली असून त्यालाही तसाच त्रास सुरु झाला आहे. त्यामुळे त्या दोघांनाही आता रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत.
ADVERTISEMENT
विषारी किडा
गॉर्डन स्मार्ट यांनी बीबीसीच्या द गुड, द बॅड आणि द अनएक्सपेक्टेड पॉडकास्टमध्ये सांगितले की, ते दोघंही पोर्तुगालमधील गोल्फ रिसॉर्टमध्ये सुट्टी घालवत होते. मात्र त्यावेळी त्या दोघांनाही अस्वस्थ आणि विचित्र वाटू लागले. त्यावेळी त्यांना जास्त मद्यपान केल्यामुळे असं वाटत असावं असं त्यांना वाटलं. मात्र त्यानंतर त्यांना समजलं की, त्यांना कोणता तरी विषारी किड्याचा स्पर्श झाल्यामुळे त्याचा त्रास त्यांना होऊ लागला आहे.
हे ही वाचा >> Maratha Reservation : ‘जरांगेना मुंबईत येण्याचा अधिकार नाही’, गुणरत्न सदावर्ते असं का म्हणाले?
डाव्या हात बधीर
या घटनेविषयी बोलताना स्मार्टने सांगितले की, त्याच्या सहलीच्या एका दिवसानंतरच त्याला ही समस्या जाणवू लागली. ट्रीप झाल्यानंतर त्याच्या डाव्या हाताला मुंग्या जाणवू लागल्या. त्यामुळे त्याला हेही जाणवू लागले की त्याला हृदयविकाराचा झटका आला आहे. मात्र तुम्हाला असं वाटू लागलं तर त्यावरच तुमचा विश्वास बसू लागतो आणि तुमच्याबाबतीत त्याच प्रकारे घडू लागलं आहे असंच वाटू लागतं.
दोघांनाही तोच त्रास
स्मार्टला त्रास जाणवू लागल्याबरोबर त्याला रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र त्यानंतर त्याला लगेच डिस्जार्जही देण्यात आला. त्यामुळे तो जेव्हा हॉटेलवर पोहचला तेव्हा त्याचा मित्र जेमी डोर्ननलाही तसेच वाटू लागले. जेमीने आपल्या त्रासबद्दल बोलताना सांगितले की, गॉर्डन रुग्णालयात गेल्यानंतर 20 मिनिटांनी माझाही डाव पाय आणि हात बधीर झाला. तर त्याच वेळी उजव्या पायालाही बधीरपणा आला आणि त्यानंतर मी थेट रुग्णवाहिकेतच असल्याचं मला दिसून आल्याचं जेमी सांगू लागला.
कुत्र्यांचाही गेला जीव
या सगळ्या घटना घडल्यानंतर डॉक्टरांनी पुढच्या आठवड्यात गॉर्डन स्मार्टला फोन करून सांगितले की, त्याला एका विषारी कीटकामुळे त्रास झाला आहे. त्यांच्या त्या ट्रीपबद्दल डॉक्टरांनी माहिती काढून सांगितले की, दक्षिण पोर्तुगालमधील गोल्ड कोर्सवर एका विशिष्ट प्रकारचे कीटक आहेत, त्या कीटकांमुळे लोकांच्या कुत्र्यांना त्रास होऊन त्यांचाही मृत्यू होतो आहे. तर अनेक लोकांना त्या कीटकाच्या स्पर्शामुळे हृदयविकाराचा झटका आला आहे असं त्यांना सांगण्यात आले.
ADVERTISEMENT