Sanjay Raut on Ajit Pawar : राज्य सरकारसह केंद्र सरकारवर खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल करत शिंदे-फडणवीस-पवार सरकारला बेकायदेशीर म्हटले आहे. खासदार संजय राऊत यांनी संभाजीनगरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाहा (Amit Shaha) यांच्यासह अजित पवार यांच्यावरही खोचकपणे टीका केली. संजय राऊत यांना शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार यांच्या भेटीविषयी आणि एकत्र येण्याविषयी अजित पवार यांच्याकडून टाळाटाळ केली जात आहे का असा सवाल त्यांना केला होता. त्यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगत अजित पवार यांना आता पाप केल्यासारखं वाटतं. त्यामुळे त्यांच्याकडून शरद पवार यांच्याबरोबर एकत्र येणं टाळलं जात असावं असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
ADVERTISEMENT
त्यांना वाटतं पाप केलं
विरोधी पक्षनेते पदावर असताना सरकारमध्ये सामील होत अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापासून वेगळी चूल मांडली. त्यानंतर दोन तीन कार्यक्रमावेळी शरद पवार यामि अजित पवार एकत्र येण्याची चिन्हे दिसत होती. मात्र ज्या ज्या वेळी एकत्र येण्याचे प्रसंग आले होते. त्या त्यावेळी अजित पवार यांनी शरद पवार उपस्थित असलेल्या मंचावर जाणे टाळले असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.
हे ही वाचा >> Sanjay Raut : ‘शिंदे सरकारचे अंत्यसंस्कार…’, संजय राऊतांचा का चढला पारा ?
शरद पवारांमुळे अजितदादा संचालक
खासदार संजय राऊत यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्या एकत्र येण्याविषयी बोलत असताना ते म्हणाले की, वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या निर्मितीत शरद पवार यांचा खूप मोठा वाटा आहे. शरद पवार यांच्यामुळेच अजित पवार त्या संस्थेवर संचालक म्हणून आहेत. मात्र आता त्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीला येत असताना मात्र अजित पवार यांनी तिथे टाळले. त्यावर संजय राऊत यांनी सांगितले की, अजित पवार आता वाटतं की, त्यांनी पाप केले आहे. त्यामुळे ते शरद पवार यांच्यासमोर येण्यास धजावत नसावेत असंही त्यांनी बोलून दाखवले.
हे ही वाचा >> NCP Election Commission : ‘तो’ प्रश्न अन् अजित पवार चिडले, पुण्यात काय घडलं?
एकत्र येण्याचे प्रसंग आणि टाळाटाळ
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यू मंडळावर शरद पवार, अजित पवार आणि दिलीप वळसे-पाटील आहेत. मात्र अजित पवारांनी शरद पवारांपासून वेगळं होत वेगळी चूल मांडल्यानंतर मात्र त्यांनी काही कार्यक्रमामध्ये जाणं टाळलं होते. त्यांच्या या एकत्र येण्याविषयी जोरदार चर्चा सुरु असतानाच आज पुन्हा एकदा संजय राऊत यांनी अजित पवार यांना त्यांनी पाप केलं आहे असं वाटत असल्यामुळेच त्यांनी त्या बैठकीला जाणं टाळलं असावं असंही त्यांनी खोचकपणे सांगितले.
ADVERTISEMENT