Akola Crime News : अकोला शहरातील खाण परिसरातील जेतवन नगरमध्ये शनिवारी सायंकाळी चाकू हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेतलं आहे. तर इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
ADVERTISEMENT
मध्यस्थी करताना संपवलं...
करण दशरथ शितळे (19) असं मृताचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, करणच्या घरासमोर वाद सुरू होता. तो वाद सोडवण्यासाठी करण गेला. मध्यस्थीचा प्रयत्न करत असताना हल्लेखोरांनी त्याच्यावरही चाकूने हल्ला केला. त्यामुळे करणच्या पोटात खोलवर जखम झाली आणि त्याचा मृत्यू झाला. या हल्ल्यात वैभव प्रशोत्तम शितळे (19), विशाल गणेश वरोटे (19) हे दोघेही गंभीर जखमी झाले. जखमींवर सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हे ही वाचा >> कुणाल कामराविरोधात आक्रमक, स्टुडिओ फोडला, शिंदेंच्या शिवसैनिकांकडून थेट 'ही' धमकी, "11 वाजता..."
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी, खदान पोलीस ठाण्याचे प्रभारी मनोज केदारे घटनास्थळी पोहोचले. सध्या पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवला आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न
जेतवन नगर पोलीस चौकीसमोर घडलेल्या या घटनेनं कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. यापूर्वीही खदान परिसरात पत्रकारावर जीवघेणा हल्ला झाला होता. त्यामुळे या परिसरात सुरक्षेबाबत आधीच भीतीचं वातावरण होतं.
CCTVच्या मदतीने हल्लेखोरांचा शोध
पोलिसांनी घटनास्थळाच्या आजूबाजूला लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज स्कॅन करण्यास सुरुवात केली आहे. प्राथमिक तपासात जुन्या वादातून घटना घडल्याचा अंदाज आहे.
हे ही वाचा >> Nanded Crime : "तू पाटील, तुझी लायकी नाही..." म्हणत तरूणाला मारहाण, मारहाणीनंतर प्रियकरानं स्वत:ला संपवलं
आठ दिवसात दोन खून, शहरात दहशतीचं वातावरण
गेल्या आठ दिवसांतील अकोल्यातील ही दुसरी हत्या आहे. यापूर्वी रेल्वे स्थानक परिसरात एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. सातत्यानं घडणाऱ्या या घटनांमुळे शहरात दहशतीचं वातावरण आहे.
ADVERTISEMENT
