तिरुपती बालाजी मंदिरात टोकन घेताना चेंगराचेंगरी, 6 भाविकांचा मृत्यू

प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिर येथे टोकन घेण्यसाठी प्रचंड गर्दी झाली होती. त्यातच चेंगराचेंगरी होऊन 6 भाविकांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

तिरुपती बालाजी मंदिरात टोकन घेताना चेंगराचेंगरी

तिरुपती बालाजी मंदिरात टोकन घेताना चेंगराचेंगरी

मुंबई तक

• 11:09 PM • 08 Jan 2025

follow google news

Tirupati Balaji stampede: तिरुमला: आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरातील वैकुंठद्वार दर्शन तिकीट केंद्राजवळ बुधवारी झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल 6 भाविकांचा मृत्यू झाला. प्रत्यक्षात सकाळपासूनच तिरुपतीच्या विविध तिकीट केंद्रांवर हजारो भाविक वैकुंठद्वार दर्शन टोकनसाठी रांगेत उभे होते. बैरागी पट्टिडा पार्क येथे भाविकांना रांगा लावण्याची परवानगी असताना ही घटना घडली. वैकुंठ द्वार दर्शन दहा दिवसांसाठी खुले करण्यात आले असून, त्यामुळे टोकनसाठी हजारो नागरिकांची गर्दी होत आहे. (andhra pradesh stampede during token collection at tirupati balaji temple 6 devotees die)

हे वाचलं का?

अचानक झालेल्या चेंगराचेंगरीमुळे गोंधळ उडाला, त्यात 6 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये मल्लिका नावाच्या महिलेचा समावेश आहे. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून तिरुपती पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. सुमारे चार हजार लोक दर्शनासाठी रांगेत उभे असल्याचे सांगण्यात येत आहे. मंदिर समितीचे अध्यक्ष बीआर नायडू यांनी परिस्थितीबाबत तातडीची बैठक घेतली आहे. बैठकीनंतर ते माध्यमांशी संवाद साधतील.

हे ही वाचा>> अचानक सगळ्यांना पडतंय टक्कल... गावकरी हादरले, बुलढाण्यात 'या' Virus ची भीती!

मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला व्यक्त शोक

तिरुपती येथील विष्णू निवासमजवळ तिरुमला श्रीवरी वैकुंठ गेटवर दर्शनासाठी टोकन घेण्यासाठी झालेल्या चेंगराचेंगरीत भाविकांचा मृत्यू झाल्याबद्दल मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. 

या घटनेचे मला खूप दु:ख झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. टोकन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक जमले असताना ही घटना घडली. या दुर्घटनेतील जखमींवर करण्यात येत असलेल्या उपचाराबाबत मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी जिल्हा आणि टीटीडी अधिकाऱ्यांशी बोलून सद्यस्थितीची माहिती घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत, जेणेकरून जखमींना चांगले उपचार मिळू शकतील.

हे ही वाचा>> Kolhapur Crime: भाचीच्या लग्नाचं रिसेप्शन, मामाने जेवणात कालवलं विष अन्... असं केलं तरी का?

वैकुंठ द्वार 10 ते 19 जानेवारी दरम्यान उघडण्यात येतील

एक दिवस आधी, तिरुमाला तिरुपती देवस्थानम (TTD) कार्यकारी अधिकारी (EO) जे श्यामला राव यांनी 10 ते 19 जानेवारी 2025 या कालावधीत होणाऱ्या वैकुंठ एकादशी आणि वैकुंठ द्वार दर्शनमच्या तपशीलवार व्यवस्थेची रूपरेषा सांगितली होती. सामान्य यात्रेकरूंना वैकुंठ द्वार दर्शन देणे ही टीटीडीची सर्वोच्च प्राथमिकता आहे यावर त्यांनी भर दिला होता.

राव यांनी घोषणा केली होती की, टीटीडीने या कालावधीत सात लाख भाविकांना सामावून घेण्यासाठी विस्तृत व्यवस्था केली आहे. सर्व यात्रेकरूंना सुरळीत आणि सुरक्षित दर्शनाचा अनुभव मिळावा यासाठी विविध विशेष प्रोटोकॉलसह वैकुंठ गेट दहा दिवस खुले राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली होती. 10 जानेवारी रोजी सकाळी 4.30 वाजता प्रोटोकॉल दर्शनाने दर्शनाला सुरुवात होईल, त्यानंतर सर्व दर्शन सकाळी 8 वाजता होईल.

    follow whatsapp