चार पाय, तीन हात… जन्माला आलं असं बाळ की बघून डॉक्टरांनाही बसला धक्का

भागवत हिरेकर

10 Nov 2023 (अपडेटेड: 10 Nov 2023, 01:38 PM)

उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये जन्माला एक बाळ चर्चेचा विषय बनले आहे. या बाळाला चार पाय आणि तीन हात आहेत. आता लाला लजपत राय मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. डॉक्टर त्याच्यावर उपचार करताहेत.

newborn baby has four legs and three arms

newborn baby has four legs and three arms

follow google news

Genetic Disorder Child : महिलेने बाळाला जन्म दिला, पण बाळ बघून डॉक्टरही शॉक्ड झाले. कारण जे बाळ जन्माला आलं, त्याला होते चार पाय, तीन हात. त्यामुळेच उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये जन्माला आलेलं हे नवजात बाळ चर्चेचा विषय बनले आहे. या बाळाला आता लाला लजपत राय मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. डॉक्टर त्याच्यावर उपचार करताहेत.

हे वाचलं का?

मंगळवारी (7 नोव्हेंबर) मुझफ्फरनगर येथील रहिवासी असलेल्या इरफानने आपल्या नवजात बाळाला मेरठच्या लाला लजपत राय मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. इरफानचे म्हणणे आहे की, त्याचे सात वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना तीन मुली आहेत. आता त्यांच्या घरी मुलगा झाला. पण त्याला चार पाय आहेत. हातही तीन आहेत.

हे ही वाचा >> ”ही तर भुजबळांची फजिती”, जरांगे पाटलांनी डिवचलं

बाळाची प्रकृती कशी आहे?

इरफानच्या म्हणण्यानुसार, मुलाचा जन्म झाल्यापासून तो ठीक आहे. प्रतिसादही देत आहे. सध्या डॉक्टर त्यांची तपासणी करण्यात व्यस्त आहेत. त्याचबरोबर मुलाची संपूर्ण तपासणी करण्यात येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. चाचण्याही केल्या जात आहेत. मुलाला दोन पाय आणि एक हात जास्त आहे.

चार पाय आणि तीन हात असलेले मेरठमध्ये जन्माला आलेलं बाळ.

असं बाळ का आलं जन्माला? डाक्टरांनी काय सांगितलं?

या प्रकरणी मेरठचे मुख्य वैद्यकीय अधिकारी (सीएमओ) डॉ. अखिलेश मोहन म्हणाले की, मुलाला दोन पाय आणि एक हात का जास्त आहे, याची कारणे शोधली जात आहेत. आमची टीम याचा अभ्यास करत आहे. हा काही चमत्कार नाही. हे विकारामुळे होते. संपूर्ण तपासणीनंतरच पुढील उपचार केले जातील, असं त्यांनी सांगितले.

हे ही वाचा >> पुण्यात शरद पवार-अजितदादांची भेट, भेटीनंतर अजित पवार अचानक दिल्लीला रवाना

डॉक्टरांनी सांगितलं की, मेडिकल सायन्समध्ये या आजाराला जन्मजात विकार म्हणतात. कधीकधी काही मुलांमध्ये जन्मजात विकार होतात. याचा संबंध अंधश्रद्धेशी जोडला जाऊ नये.

    follow whatsapp