Beed Accident News : अंत्यविधीला निघाले पण तिघांनी गमावला जीव, पुण्यावरून निघालेल्या कारचं झालं तरी काय?

मुंबई तक

29 Jun 2023 (अपडेटेड: 29 Jun 2023, 03:54 PM)

Maharashtra News Today live Marathi: नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी जाणाऱ्या एका स्कार्पिओ कार आणि टेम्पोच्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर तिघे जण गंभीर जखमी झाले. बीडमध्ये हा भयंकर अपघात घडला.

Three died on the spot in a horrific accident between a Scorpio car and a Tempo on their way to a relative's funeral. Three people were seriously injured. This terrible accident took place in Beed

Three died on the spot in a horrific accident between a Scorpio car and a Tempo on their way to a relative's funeral. Three people were seriously injured. This terrible accident took place in Beed

follow google news

Beed Accident: रोहिदास हातागळे, बीड: नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी पुण्याहून मारफळा (ता. गेवराई) येथे निघालेली स्कार्पिओ जीप आणि टेम्पोच्या भीषण अपघातात (Car-Tempo Accident) जीपमधील तिघांचा जागीच मृत्यू (3 Death) झाल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. या अपघातात अन्य तिघे जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. अपघाताची ही घटना 28 जून रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास बीड-कल्याण राज्य महामार्गावरील डोंगरकिन्ही जवळील जाटनांदूर फाट्याजवळ भिलारवाडी (ता. शिरुर) जवळ घडली. या घटनेने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. (beed horrific accident between scorpio car tempo 3 died on the spot relative funeral 3 people seriously injured)

हे वाचलं का?

नेमका अपघात कसा घडला?

तिघेही मयत हे वडवणी व माजलगाव तालुक्यातील आहेत. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या माहितीनुसार, आसराबाई काशिनाथ कांबळे (वय 60 रा. नित्रुड, ता. माजलगाव), रमेश कुंडलीक हातागळे (वय 38 रा. कुप्पा. ता. वडवणी) आणि जीपचालक ताजोद्दीन मुजावर अशी मयतांची नावे आहेत तर अनिता रमेश हातागळे (वय 35 वर्ष), सविता दत्तात्रय हातागळे (वय 32 वर्ष), दत्ता कुंडलीक हातागळे (वय 45 सर्व रा. कुप्पा. ता. वडवणी) हे तिघे जखमी असून त्यांच्यावर बीड जिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

हे ही वाचा >> PUNE: दर्शना पवारच्या हत्येसाठी नराधम राहुलने राजगड आणि सोमवारच का निवडला?

बीड- कल्याण राज्य महामार्गाविरील जाटनादूर (ता. शिरुर) जवळील घोडेवाडी येथे बीडहून नगरकडे टेम्पो (MH-21-BH-3820) निघाला होता. दरम्यान नगरहून गेवराई तालुक्यातील मारफळा गावाकडे स्कार्पिओ कारमधून (MH-12-FK-9010) सहा जण नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी पुण्याला निघाले होते. बुधवारी सायंकाळी 5 वाजता एका वळणावर स्कार्पिओ आणि टेम्पोची समोरासमोर जोरदार धडक झाली.

या अपघातात जीपमधील आसराबाई काशिनाथ कांबळे, रमेश कुंडलीक हातागळे व चालक ताजोद्दीन मुजावर हे ठार झाले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर अंमळनेर पोलीस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले. सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरु केले. दरम्यान उत्तरीय तपासणीसाठी तिघांचे मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.

हे ही वाचा >> ‘शिंदे फक्त 5 आमदारांसोबत आले असते तरी…’, भाजप नेत्याचं मोठं विधान

वळणावर चालकाचे सुटले नियंत्रण

बीड-कल्याण राज्य महामार्गावरील एका वळणावर कार चालक ताजोद्दीन मुजावर याचे नियंत्रण सुटल्यामुळे भरधाव स्कार्पीओ कार ही याच मार्गावरून येणाऱ्या टेम्पोवर जाऊन धडकल्याने हा भीषण अपघात घडला. या अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. अशी माहिती अंमळनेर ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोरक्ष पालवे यांनी दिली.

    follow whatsapp