Delhi Blast : धडाम आवाज, धुराचे लोट... CRPF च्या शाळेबाहेर ब्लास्ट, दिल्ली हादरली, प्रकरण काय?

मुंबई तक

• 12:08 PM • 20 Oct 2024

Delhi Blast : दिल्लीतील रोहिणी परिसरातील प्रशांत विहार भागात स्फोट झाला. विशेष म्हणजे CRPF च्या शाळेच्या कम्पाऊंडबाहेर ही घटना घडली. ब्लास्ट एवढा भीषण होता की, शाळेच्या कम्पाऊंड वॉलला यामुळे तडे गेलेत.

CRPF च्या शाळेबाहेर ब्लास्ट, दिल्ली हादरली

CRPF च्या शाळेबाहेर ब्लास्ट, दिल्ली हादरली

follow google news

बातम्या हायलाइट

point

रविवारच्या सकाळी दिल्ली हादरली

point

CRPF शाळेबाहेर मोठा ब्लास्ट

point

घटनास्थळी NGS कमांडो दाखल

रविवारची सकाळ, 7 - 7:30 ची वेळ, दिल्ली पोलिसांचा फोन खनखनला आणि CRPF च्या शाळेजवळ स्फोट झाल्याची माहिती दिल्ली पोलिसांना मिळाली. दिल्लीतील रोहिणी परिसरातील प्रशांत विहार भागात ही घटना घडली. विशेष म्हणजे CRPF च्या शाळेच्या कम्पाऊंडबाहेर ही घटना घडली. ब्लास्ट एवढा भीषण होता की, शाळेच्या कम्पाऊंड वॉलला यामुळे तडे गेलेत. तसंच आजूबाजूच्या परिसरातील इमारतींच्या, गाड्यांच्या काचाही फुटल्या. ही शाळा CRPF ची असल्यानं या घटनेनंतर यंत्रणा पूर्ण अलर्ट झाल्या असून, दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. (Blast in Delhi near Rohini CRPF School)

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Sanjay Raut : 20 ला निवडणूक, 23 ला निकाल, तर 26 नोव्हेंबरला राष्ट्रपती राजवट? राऊतांचा थेट शाहांवर निशाणा


दिल्लीत झालेला या स्फोट नेमका कशामुळे झाला, यामध्ये काय काय वापरलं गेलं, हे सगळं आता पोलिसांच्या तपासात समोर येणार आहे. आजूबाजूला दूरदूरपर्यंत या स्फोटाचा आवाज पोहोचला, त्यानंतर काही लोकांनी ही घटना मोबाईलमध्ये चित्रित करण्याचा प्रयत्न केला. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये धुरांचे ऊंच ऊंच लोट दिसत आहेत.

या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन केंद्रीय तपास यंत्रणाही अलर्ट झाल्या असून, NSG कमांडो देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत दरम्यान, ज्याठिकाणी ही घटना घडली तिथे शाळेच्या आजूबाजूला अनेक दुकाना आहे. त्यामुळे या दुकानांमधील गॅस सिलिंडरचा हा ब्लास्ट आहे का? असाही संशय सध्या निर्माण झालेला आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, "7:44 च्या आसपास ही घटना घडली. पहिल्यांदा आवाज आला तेव्हा वाटलं की, सिलेंडरचा ब्लास्ट झाला. मात्र ट्रान्सफॉर्मर किंवा सिलेंडर फुटलं तर एवढा आवाज येत नाही. असं कधीही वाटलं नव्हतं की एवढ्या शांत परिसरात अशी घटना घडेल. ही दररोज भरपूर गर्दी असते मात्र आज रविवारची सकाळ असल्याने कुणीही जखमी झालं नाही असं कळतंय." त्यामुळेच या घटनेच्या तपासातून काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 

 

 

    follow whatsapp