Bus Driver Caught On CCTV : कुर्ला बस अपघाताच्या दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या अपघाताला कोण जबाबदार आहे? असा प्रश्न उपस्थित झाला होता. बस प्रवासादरम्यान रस्त्याच्या बाजूला असलेले सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले होते. चालकाचा बस चालवताना नियंत्रण कसं सुटलं? अपघाताच्यापूर्वी बसचा वेग नेमका किती होता? या सर्व गोष्टींचा तपास लावण्यासाठी हे व्हिडीओ तपासण्यात आले. अशातच आता थेट बसमधील सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. या व्हिडीओत बस चालक संजय मोरेही स्पष्टपणे दिसत असल्याचं समोर आलंय.
ADVERTISEMENT
सीसीटीव्ही फुटेजमध्ये नेमकं काय?
प्रवाशांनी भरलेली बस भरधाव वेगाने रस्त्यावरील पादचाऱ्यांना गाड्यांना धडक देत जाते. त्याचदरम्यान बसमधील प्रवाशांची धांदल उडते. कंडक्टर प्रवाशांचे तिकीट काढत असतानाच अचानक बस चालकाने वेग वाढवल्याने प्रवाशांचा बॅलेन्स जात असल्याचंही या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. बस कमानीला धडकल्याने बसच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आणि लागलीच प्रवासी बॅग घेऊन बाहेर पळाले. याच दरम्यान चालक संजय मोरेनेही हातात बॅग घेऊन खिडकीतून उडी घेत पळ काढला.
हे ही वाचा >> Devendra Fadnavis : ...म्हणून शिंदे दिल्लीला आले नाही, मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल बोलताना फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं
कुर्ला येथे सोमवारी रात्री झालेल्या बस अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला असून 49 जण जखमी झाल्याची माहिती आहे. या भीषण अपघाताच्या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. अपघात घडताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसच कुर्ला पोलीस स्टेशनमध्ये बस चालक संजय मोरेविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. बसच्या वेगावर नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचं मोरेंनी प्राथमिक जबाबात माहिती दिल्याचं समजते.
हे ही वाचा >> Ajit Pawar meets Sharad Pawar Delhi : पवारांची भेट, अर्ध्या तासानंतर बाहेर, अजितदादा, भुजबळ, पटेल काय म्हणाले?
बसमध्ये कुठलाही बिघाड नव्हता. बस चालवण्यासाठी देण्यापूर्वी कधीही त्या चालकाचा अनुभव गृहीत धरूनच नेमणूक करण्यात येते. परंतु, या चालकाला मोठं वाहन चालवण्याचा अनुभवच नव्हता, अशी माहिती प्राथमिक तपासात उघड झाली. तर बस चालकाने मद्यधुंद अवस्थेत बस चालवल्याने हा भयानक अपघात घडल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला.
ADVERTISEMENT