Chandrayaan-3 Landing VIDEO: भारताचं चंद्रावर पहिलं पाऊल, पुन्हा-पुन्हा पाहावा असा ऐतिहासिक क्षण!

रोहित गोळे

23 Aug 2023 (अपडेटेड: 23 Aug 2023, 01:49 PM)

Chandrayaan-3 Landing Live- भारत नवा इतिहास रचणार आहे. इस्रोचं (ISRO) चांद्रयान-3 (Chandrayaan-3) चंद्रावर उतरणार आहे. लँडिंगदरम्यानचे अत्यंत महत्त्वाची दृश्य पाहा फक्त मुंबई Tak वर.

chandrayaan 3 landing live video vikram lander landing soon historic moment for india and isro scientist

chandrayaan 3 landing live video vikram lander landing soon historic moment for india and isro scientist

follow google news

Chandrayaan-3 Landing: बंगळुरू: भारत नवा इतिहास रचणार आहे. इस्रोचं (ISRO) चांद्रयान-3 (Chandrayaan-3) चंद्रावर उतरणार आहे. चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करण्याचा प्रयत्न करेल. यामध्ये यश मिळाल्यास भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश ठरणार आहे. अवघ्या जगाचं लक्ष चांद्रयान-3 कडे लागलं आहे. (chandrayaan 3 landing live video vikram lander landing soon historic moment for india and isro scientist)

हे वाचलं का?

पाहा चांद्रयानाचं Landing LIVE:

असं झालं विक्रमचं लँडिंग

  • विक्रम लँडरने 25 किमी उंचीवरून चंद्रावर उतरण्याचा प्रवास सुरू केला. पुढील टप्प्यावर पोहोचण्यासाठी सुमारे 11.5 मिनिटे लागली.
  • 7.4 किलोमीटर उंचीपर्यंत त्याचा वेग 358 मीटर प्रति सेकंद होता. पुढील प्रवास 6.8 किलोमीटरचा होता.
  • 6.8 किमी उंचीवर, वेग 336 मीटर प्रति सेकंद कमी झाला होता. पुढील स्तर 800 मीटर होता.
  • 800 मीटर उंचीवर लँडरचे सेन्सर्स चंद्राच्या पृष्ठभागावर लेझर किरण टाकून लँडिंगसाठी योग्य जागा शोधली.
  • 150 मीटर उंचीवर लँडरचा वेग 60 मीटर प्रति सेकंद होता. म्हणजे 800 ते 150 मीटर उंचीच्या दरम्यान होतं.
  • 60 मीटर उंचीवर लँडरचा वेग 40 मीटर प्रति सेकंद होता. म्हणजे 150 ते 60 मीटर उंचीच्या दरम्यान होता.
  • 10 मीटर उंचीवर लँडरचा वेग 10 मीटर प्रति सेकंद होता.
  • चंद्राच्या पृष्ठभागावर उतरताना म्हणजेच सॉफ्ट लँडिंगसाठी लँडरचा वेग 1.68 मीटर प्रति सेकंद होता.
  • ISRO च्या शास्त्रज्ञांनी ज्या पद्धतीने हे मिशन आखलं होतं त्यानुसार विक्रम लँडरचं लँडिंग झालं.
  • चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे.
  • आतापर्यंत फक्त चार वेळा चंद्रावर यान उतरविण्यात आलं आहे. ज्यामध्ये आता भारताचाही नंबर लागला आहे.

 

    follow whatsapp