रिव्हर्स गिअर, दरीत कार... Reel च्या नादात तरूणी जागीच ठार! Viral Video

रोहिणी ठोंबरे

18 Jun 2024 (अपडेटेड: 18 Jun 2024, 12:42 PM)

Chhatrapati Sambhajinagar Accident : रील बनवण्याच्या नादात एका 23 वर्षीय तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

रील बनवणाऱ्या तरूणीसोबत नेमकं काय घडलं?

Reel Girl Chhatrapati Sambhajinagar Accident : रील बनवण्याच्या नादात एका 23 वर्षीय तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या या धक्कादायक घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरा बसला आहे. 30 सेकंदाची ही रील तरूणीच्या जीवावर बेतली आहे. श्वेता दीपक सुरवसे असे या मृत तरूणीचे नाव आहे. तिच्या आयुष्यातील ही शेवटची रील ठरली...  (chhatrapati sambhajinagar accident 23 years young girl lost her life while making reel by driving car in reverse gear She collapsed in valley

हे वाचलं का?

सोशल मीडियावर लोकांचे रील्स बनवण्याचे वेड इतके वाढले आहे की, ते यासाठी कोणत्याही थराला जायला तयार असतात. याचे जीवंत उदाहरण म्हणजे छत्रपती संभाजीनगरमधील ही घटना आहे. खुलताबाद परिसरात असणाऱ्या सूलीभंजन येथील दत्त मंदिराजवळ हा भयानक अपघात सोमवारी (17 जून) दुपारच्या सुमारास घडला. या घटनेनंतर सर्वत्र एकच खळबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. 

23 वर्षीय श्वेता दीपक सुरवसे ही छत्रपती संभाजीनगर येथील हनुमाननगर येथील रहिवासी होती. सूलीभंजन येथील दत्त मंदिर परिसरात ती कारमध्ये बसून रील बनवत होती. यावेळी तिचा 25 वर्षीय मित्र सूरज संजय मुळे हा रील शूट करत होता. 

हेही वाचा : MVA : काँग्रेसचं वादाच्या मुद्द्यावर 'बोट', उद्धव ठाकरे धडा घेणार का?

घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, "श्वेता कार चालवत होती. कार रिव्हर्स गिअरमध्ये होती. यादरम्यान तिचा पाय ब्रेकऐवजी एक्सलेटरवर गेला. यानंतर कार थेट टेकडीवरून 300 फूट खोल दरीत कोसळली." काही मिनिटांपूर्वी हसणाऱ्या श्वेताचा क्षणातच जीव गेला. ही घटना इतक्या वेगाने घडली की कोणालाही काहीच करण्याची संधी मिळाली नाही. 

हेही वाचा : Government Job: इंजिनीअर्ससाठी PGCIL मध्ये नोकरीची संधी! जाणून घ्या पगार किती?

मंदिर परिसरात जर संरक्षण भिंत किंवा लोखंडी कठडे असते तर हा अपघात टळला असता, अशी सध्या चर्चा सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच खुलताबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि इतर पोलीस शिपाई घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. दरीत पडलेल्या कारमधून श्वेताला बाहेर काढून खुलताबाद ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

    follow whatsapp