Chhatrapati Shivaji maharaj : अफजल खान वधातील महाराजांची ‘ती’ वाघनखं आता मायभूमीत

मुंबई तक

08 Sep 2023 (अपडेटेड: 08 Sep 2023, 08:38 AM)

Chhatrapati Shivaji maharaj : ज्या अफजल खानाचा वध छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनखांनी केला. ती वाघनखं आता लंडनमधून आता महाराजांच्या मायभूमीत येणार आहेत. त्यासाठीचे सर्व मार्ग आता खुले झाले आहेत.

Chhatrapati shivaji maharaj wagh nakh coming back to india from uk

Chhatrapati shivaji maharaj wagh nakh coming back to india from uk

follow google news

Chhatrapati Shivaji maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघ नखांनी अफजल खानाचा वध केला होता, ती वाघनखं म्हणजे भारतीयांसाठी नेहमीच अभिमानाची वाटत राहिली आहेत. तिच वाघनखं (Wagh nakh) आता भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 1659 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूरचा सेनापती अफझल खान याचा वध करण्यासाठी वाघ नखांचा वापर केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांची तिच वाघ नखं आता भारताला परत करण्याचे ब्रिटनच्या अधिकाऱ्यांनी मान्य केले आहे. याबाबत राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Culture Minister Sudhir Mungantiwar) यांच्याकडून या महिन्याच्या अखेरीला व्हिकोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयसोबत सामंजस्य करार करणयासाठी लंडनचा दौरा करणार आहेत. याबाबत योग्य तो करार झाला तर या वर्षीच छत्रपती शिवाजी महाराज यांची ती ऐतिहासिक वाघ नख मायभूमीत परत येणार आहेत.

हे वाचलं का?

ऐतिहासिक वाघनखं मायभूमीत

सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लंडनमधील वाघ नखांविषयी बोलताना सांगितले की, ब्रिटनच्या अधिकाऱ्यांचे यासंदर्भातील एक पत्र मिळाले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांची ऐतिहासिक वाघनखं पुन्हा भारताकडे सुपूर्द करण्याचा विचार केला आहे. हिंदू तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या दिवशी अफजल खानाचा वध केला होता. त्याच दिवशी ती वाघनखं भारताल परत करणार असल्याचेही ब्रिटनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा >> Maratha Morcha : जरांगे पाटलांचं शिष्टमंडळ आज मुख्यमंत्र्यांना भेटणार, आज तोडगा निघणार?

जगदंबा तलवारही भारतात येणार

सामंजस्य करारावर सही करण्याबरोबरच सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की, यूकेमध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार आणि इतर ऐतिहासिक वस्तूही भारतात परत आणण्याचा विचार आम्ही करत आहोत असंही त्यांनी सांगितले. त्यासाठी सरकार योग्य ती पावलं उचलत असून लवकरच त्याबाबत निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

हिंदू तिथीनुसार सुपूर्द

महाराष्ट्रात शिवाजी महाराज यांची वाघनखं परत येणार असल्याने महाराष्ट्रवासियांसाठी ही मोठी गोष्ट असून ती अभिमानाचीही आहे असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून अफजल खान वधाची तारीख ग्रेगोरियन कॅलेंडरवर 10 नोव्हेंबर आहे मात्र ब्रिटनमधून ती वाघनखं हिंदू तिथीनुसार भारताकडे सुपूर्द केली जातील असंही यावेळी त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मुनगंटीवार थेट लंडनला

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वाघनखांचे महत्व अधोरेखित करताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, वाघनखं हा एक अमूल्य खजिना आहे. राज्यातील तमाम जनतेच्या भावना या वाघनखाबरोबर जोडल्या गेल्या आहेत. ही वाघनखं हस्तांतर करताना जबाबदारी आणि काळजीने घेणे गरजेचे असल्यामुळेच सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव डॉ. विकास खारगे व सुधीर मुनगंटीवार, राज्य पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्ग यांनी लंडनमधील व्हिकोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयाला भेट देणार आहेत.

हे ही वाचा >> Rain Update : राज्यात दोन दिवसात सर्वत्र पाऊस, बळीराजाला मिळणार दिलासा

वाघनखाचा इतिहास…

ज्या वाघनखांचा वापर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध करण्यासाठी वापरला होता, ती वाघनखं सर्वप्रथम शिवाजी महाराजांनीच वापरली होती. त्याचबरोबर निहंग शिखांमध्येही ही लोकप्रिय शस्त्र आहे, जे त्यांच्या पगडीमध्ये ठेवले जाते. तर त्यांच्या डाव्या हातामध्येही धरतात. या प्रकारची निहंगांकडे अनेक पारंपारिक शस्त्रेदेखील आहेत, त्यापैकी एक शेर-पंजा आहे ते या वाघनखासारखेच आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखं भारतात येणार असल्याने महाराष्ट्रातील शिवप्रेमींतून आनंद व्यक्त केला जात आहे. यावर सुधीर मुनगंटीवार यांनी योग्य त्या बाबी पूर्ण करून ऐतिहासिक वस्तू भारतात परत आणण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

    follow whatsapp