Parbhani News : आंदोलनाला हिंसक वळण! पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, नेमकं काय घडलं?

मुंबई तक

11 Dec 2024 (अपडेटेड: 11 Dec 2024, 06:39 PM)

Parbhani Latest News : परभणी शहरामध्ये सुरू असलेल्या बंद दरम्यान हिंसक वळण लागल्यानंतर ,प्रशासनाने शहरात 144 कलम लागू करण्याची घोषणा केली असून ,या घोषणेनंतर जमावाला आपल्या घरी जाण्याच आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Dr. Babasaheb Ambedkar, Parbhani Latest News

Dr. Babasaheb Ambedkar, Parbhani Latest News

follow google news

Parbhani Latest News : परभणी शहरामध्ये सुरू असलेल्या बंद दरम्यान हिंसक वळण लागल्यानंतर ,प्रशासनाने शहरात 144 कलम लागू करण्याची घोषणा केली असून ,या घोषणेनंतर जमावाला आपल्या घरी जाण्याच आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे. परभणी शहरात सकाळपासून शांततेत सुरू असलेला बंद ला अचानक हिंसक वळण लागल्या नंतर, त्यानंतर पोलिसांनी यावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले, परंतु जमाव नियंत्रित होत नसल्याने ,अखेर प्रशासनाने 144 कलम लागू केला आहे.

हे वाचलं का?

परभणी शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर संविधानाची विटंबणा करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी सायंकाळी घडला होता. आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत रास्ता रोको आणि रेल रोको केला. परभणी शहरात बंदची हार पुकारली होती. परंतु, आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावरील दुकाने, गाड्या जाळूल्याने या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी संतप्त जमावावर लाठीचार्ज केला आणि अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यामुळे शहरात तणापूर्ण शांतता आहे. खासदार संजय जाधव यांनी नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. 

हे ही वाचा >>  ladki Bahin Yojana : 'त्या' 10 हजार महिलांना मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचा लाभ! यादीत तुमचं नाव आहे का?

परभणी शहरामध्ये काल घडलेल्या खळबळजनक प्रकारानंतर आज परभणी जिल्हा बंदचं आवाहन करण्यात आलं होतं. परंतु, या बंदला हिंसक वळण लागल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी 144 कलम लागू केलं. तसच  नागरिकांना शांततेचं आवाहन करण्यात आलं आहे.  परभणीमध्ये वाढलेल्या तणावाची परिस्थिती पाहता पोलिसांची अधिक कुमक मागवली असल्याची माहिती,  जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आलीय.

हे ही वाचा >> 11 November 2024 Gold Rate: आरारारा! सोन्याचे भाव गगनाला भिडले; मुंबई-पुण्यातील दर वाचून अनेकांना फुटला घाम

परभणीमध्ये आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर नांदेड विभागाचे आयजी शहाजी उमाप यांनी परभणीमधील दंगलग्रस्त भागाची पाहणी केली.   तसच परभणी येथील तणापूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला आहे. याप्रकरणी दोषींवर कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिलीय. 

    follow whatsapp