7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी यंदाची दिवाळी आणखीनच तेजोमय असणार आहे. कारण यावेळी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात भरघोस वाढ होणार असल्याचे दिसत आहे. केंद्र सरकार (Central Govt) आपल्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात (DA) वाढ देऊन दिवाळीत भेट देण्याचा विचार करत आहे. त्यातच दसऱ्याच्या मुहूर्तावर त्याची घोषणाही करण्याचा विचार सरकार करत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र सरकारच्या या गोष्टीवर विश्वास ठेवलाच तर मात्र सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीत आणखी मोठी भेट म्हणून महागाई भत्यात (Dearness Allowance) 4 टक्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
वाढीव वेतन नोव्हेंबरमध्ये
केंद्र सरकारने महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला तर तो सध्याच्या 42 टक्क्यांवरुन 46 टक्क्यांपर्यंत जाणार आहे. त्यामुळे अशी शक्यताही आहे की, सरकार महागाई भत्यात 3 टक्क्यांनी वाढवण्यात आली तर ते 45 टक्क्यांपर्यंत जाणार आहे. ही वाढ करण्यात आली तर 1 जुलै पासून लागू होणार असून जुलै ते ऑक्टोबर या कालावधीतील थकबाकीसह नोव्हेंबर महिन्यामध्ये हे वाढीव वेतन मिळणार आहे. सरकारने ही निर्णय घेतला तर त्याचा फायदा 47 लाख कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांना होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हे ही वाचा >> Hamas: ‘त्यांनी मला शोधून थेट माझ्यावर…’, ‘त्या’ मुलीची अंगावर काटा आणणारी कहाणी
मूळ पगारात वाढ
महागाईमध्ये कर्मचाऱ्यांना त्याचा त्रास होऊ नये यासाठी सरकारकडून दर 6 महिन्यांनी महागाई भत्यात वाढ करत असते. त्यामुळे मूळ पगारात वाढ होते आणि त्याचा फायदा सरकारी कर्मचाऱ्यांना होत असतो.ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आधारे महागाई भत्ता निर्धारित केला जातो. मात्र आता 4 टक्क्यांनी ही वाढ होण्याची शक्यता असतानाही ती आता 3 टक्क्यांनीच वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महागाई भत्ता असा वाढणार
या दिवाळीत सरकारकडून कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ केली तर 18,000 रुपये मूळ वेतन घेणाऱ्या कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यात 7,560 रुपयांवरून 8,100 रुपये होणार आहे. या वाढीमुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात थेट 540 रुपयांनी वाढ होणार आहे. तर त्यामध्ये 4 टक्क्यांनी वाढ झाल्यास महागाई भत्ता 8,280 रुपये आणि पगार 690 रुपयांनी वाढणार आहे. जर आपण कमाल मूळ वेतनाच्या आधारावर त्याची गणना केली गेली तर 45 टक्के दराने 56,900 रुपयांचा डीए 23,898 रुपयांऐवजी 25,605 रुपये होणार आहे. तर 46 टक्क्यांनुसार त्याची वाढ 27,554 रुपये होणार आहे.
हे ही वाचा >> Crime: 12 वर्षाच्या मुलीवर वासनांध बापाची घाणेरडी नजर, निर्जन स्थळी नेत पाशवी बलात्कार
मूळ वेतन जास्त होणार
तर 56,900 रुपये मूळ पगार असलेल्या कर्मचाऱ्यांना 42 टक्क्यांनी डीए वाढणार आहे. त्यामुळे त्यांच्या महिन्यामध्ये 23,898 रुपये मिळणार आहेत. कर्मचाऱ्यांचा डीए 46 टक्क्यांपर्यंत वाढला तर महिन्याची वाढ ही 26,174 रुपयांपर्यंत वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे, ज्यांचे मूळ वेतन जास्त असणार आहे, त्यांना 27,312 रुपयांनी वार्षिक पगारवाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ADVERTISEMENT