Dahi Handi: 'गोविंदा आला रे आला'; मुंबई-ठाण्यातील 'या' भागांमध्ये दहीहंडीचे लागणार सर्वात उंच थर! 

रोहिणी ठोंबरे

27 Aug 2024 (अपडेटेड: 27 Aug 2024, 01:19 PM)

Famous Dahi Handi in Mumbai Thane : आज (27 ऑगस्ट) दहीहंडीचा उत्सव ठिकठिकाणी जल्लोषात साजरा करण्यासाठी बालगोपाळ उत्साही आहेत. दरवर्षी मुंबई आणि ठाण्यात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

Mumbaitak
follow google news

Famous Dahi Handi in Mumbai Thane : आज (27 ऑगस्ट) दहीहंडीचा उत्सव ठिकठिकाणी जल्लोषात साजरा करण्यासाठी बालगोपाळ उत्साही आहेत. दरवर्षी मुंबई आणि ठाण्यात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यासाठी गोविंदाचे ग्रुप्स आणि आयोजक अनेक दिवसांपासून तयारी करत असतात. आज सकाळपासून मुंबई आणि ठाण्यातील रस्त्यांवर कृष्ण जन्माष्टमी साजरी होणार आहे. 'गोविंदा आला रे आला'चा गजर गल्लीबोळात ऐकू येत आहे. दहीहंडी फोडण्यासाठी शहरातील विविध भागातील तरुणांचे ग्रुप्स निघणार आहेत. (Dahi Handi 2024 Govinda ala re ala The highest and famous Dahihandi groups in Mumbai-Thane know it)

हे वाचलं का?

दरवर्षीप्रमाणे यंदाही राजकीय पक्ष दहीहंडी उत्सवात उत्साहाने सहभागी होत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक दिग्गज नेते अनेक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. जन्माष्टमीच्या निमित्ताने मुंबई आणि ठाण्यात अनेक दशकांपासून साजऱ्या होणाऱ्या या लोकप्रिय उत्सवासाठी लाखोंची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. हा पुरस्कार सर्वात उंच थर लावणाऱ्या ग्रुपला दिला जातो.

हेही वाचा : Maharashtra weather: बाई... हा काय प्रकार? केवढा तो पाऊस, पुढील 48 तास राज्यासाठी धोक्याचे!

यंदा मुंबई-ठाण्यातील कोणत्या भागांमध्ये दहीहंडीचे उंच थर लागणार?

1) ठाणे - संस्कृती प्रतिष्ठान

आयोजक- आमदार प्रताप सरनाईक

स्थळ - ठाणे महानगरपालिका शाळेचे मैदान, वर्तक नगर, ठाणे

यंदा सर्वात पहिला नऊ थर लावणाऱ्या गोविंदा ग्रुपला 11 लाखांचे बक्षीस देण्यात येणार आहे.

2) ठाणे- मनसे दहीहंडी उत्सव

आयोजक- मनसे नेते अविनाश जाधव

ठिकाण - भगवती मैदान, विष्णू नगर, नौपाडा, ठाणे

3) ठाणे – दिघे साहेबांची हंडी (शिवसेना) मानाची हंडी

मार्गदर्शक - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठिकाण- टेंभी नाका, ठाणे

हेही वाचा : Ladki Bahin Yojana : 'हे' काम आताच करून घ्या, नाहीतर योजनेचे 4500 गमावून बसाल!

4) राम कदम दहीहंडी

भाजप आमदार राम कदम यांनी पुन्हा एकदा मुंबईतील घाटकोपरमध्ये भारतातील सर्वात मोठी दहीहंडी उभारण्याचा दावा केला आहे. मात्र, बक्षीसाची रक्कम अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

स्थळ- घाटकोपर श्रेयस सिग्नल

5) मुंबईतील वरळी येथील जांबोरी मैदानावर भाजपच्या परिवर्तन दहीहंडी उत्सवात एकूण 50 लाखांहून अधिक बक्षीस रक्कम ठेवण्यात आली आहे. यात अनेक बडे नेते आणि अभिनेते सहभागी होणार आहेत. वरळी येथील हनुमान मैदान आणि वीर जिजामाता नगर येथे शिवसेना उद्धव गटाच्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

6) साई जलाराम प्रतिष्ठानची दहीहंडी

ठाणे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते देवराम भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली बाळकूम जकात नाका येथील साई जलाराम प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सवात लाखोंची बक्षिसे दिली जाणार आहेत.

7) धारावीत 11 लाख 111 रुपयांच्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे.

8) विक्रोळीत मनसे आणि शिवसेनासुद्धा लाखो रुपयांची बक्षिसे असलेली दहीहंडी आयोजित करणार आहेत.

9) बोरिवलीतील मागाठाणे प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडीत लाखो रुपयांचे बक्षीस देणार, त्यात अनेक सेलिब्रिटींची एन्ट्री दिसणार आहे.

10) ठाण्यात आमदार प्रताप सरनाईक यांच्याप्रमाणेच मनसे नेते अविनाश जाधव आणि शिवसेना नेते नरेश मस्के यांनीही दहीहंडीचा मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे.

    follow whatsapp