Viral Video: भर पावसात मुंबईच्या 'या' सोसायटीत घुसला सर्वात खतरनाक प्राणी! लोकांची बोबडी वळली

मुंबई तक

• 11:12 AM • 30 Sep 2024

Monitor Lizard Enters In Goregaon Society Video Viral : मागील आठवड्यात मुंबईत मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला होता. त्यामुळे लोकांना रस्त्यावरून येजा करताना अनेक समस्यांचा सामना करावा लागला.

Monitor Lizard Dangerous Video

Monitor lizard Enters In Mumbai Goregaon Society

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईच्या गोरेगावच्या सोसायटीत घुसणापा तो खतरनाक प्राणी कोणता?

point

भर पावसात या भयानक प्राण्याने सोसायटीत एन्ट्री केली अन् घडलं...

point

विशालकाय प्राण्याचा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

Monitor Lizard Enters In Goregaon Society Video Viral : मागील आठवड्यात मुंबईत मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला होता. त्यामुळे लोकांना रस्त्यावरून येजा करताना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ फोटो व्हायरल झाले. पण गोरेगाव पूर्वच्या अवासीय सोसायटीच्या व्हिडीओनं इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, मगरीसारखा दिसणार एक खतरनाक प्राणी ( Monitor Lizard) सोसायटीत प्रवेश करतो. त्यानंतर जे काही घडतं ते पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. 

हे वाचलं का?

सोसायटीत फिरत होता खतरनाक प्राणी

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, मॉनिटर लिझार्ड प्राण्याचा हा व्हिडीओ एका ग्रीलच्या खिडकीतून काढला आहे. हा भयानक प्राणी सोसयटीच्या आवारात हळूहळू वावर करत असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. 23 सेकंदाच्या या व्हिडीओला @andheriwestshitposting नावाच्या यूजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. पोस्ट शेअर करत यूजरने कॅप्शन मध्ये लिहिलंय की, गोरेगाव इस्ट हाऊसिंग सोसायटीत एक मॉनिटर लिझार्ड (छिपकली) दिसली. या प्राण्याच्या सुरक्षेबाबत खूप चिंता आहे. 

हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो! '...तरच मिळतील 4500 किंवा 1500 रुपये?' सरकारचा नियम एकदा वाचाच

व्हिडीओ पाहून अनेकांचा उडाला थरकाप

इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या व्हिडीओला आतापर्यंत 7 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर 1 लाखांहून अधिक लोकांनी या व्हिडीओला पाहिला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर एका यूजरने मजेशीर प्रतिक्रिया देत म्हटलं, मला फक्त एकच आशा आहे की, त्या प्राण्याने गोकुलधाम सोसायटीत प्रवेश केला नाही पाहिजे आणि बबीताला घाबरवू नये. दूसऱ्या यूजरने म्हटलं, पळा, पळा, पळा..

तिसऱ्या यूजरने म्हटलं, विशालकाय छिपकली विषारी नाही आणि खतरनाकही नाही. या प्राण्याला सहज हाताळू शकतो. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या प्राण्याचा व्हिडीओ पाहून अनेकांचा थरकाप उडाला आहे. हा एक खतरनाक प्राणी असल्याचंही काहींचं म्हणणं आहे. वन विभागाने या प्राण्यांना सुरक्षीत ठिकाणी नेलं पाहिजे, जेणेकरून मानवी वस्तीत हे प्राणी कुणावर हल्ला करणार नाहीत, अशा प्रतिक्रियाही नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. 

    follow whatsapp