डोंबिवली: तोल जाऊन डम्परच्या मागच्या चाकाखाली आल्याने एका दुचाकीस्वाराचा मृत्यू (Accident) झाल्याची धक्कादायक घटना कल्याण-मलंग रोडवरील द्वारली परिसरात घडली. काल रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. रस्त्यारील खड्डे चुकवत असताना या दुचाकीस्वाराचा तोल गेला, खड्ड्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. सूरज गवारी असे मयत इस्माचे नाव असून कल्याण पूर्व चिंचपाडा येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. (death two-wheeler rider kalyan falling into pit and falling under the back tire of a dumper accident news)
ADVERTISEMENT
नेमका अपघात कसा घडला?
कल्याण-मलंग रोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून मार्गक्रमण करताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. खड्डे चुकवताना अनेकदा या रोडवर अपघात होत असतात. हे खड्डे बुजवून रस्ता सुस्थितीत करण्याची मागणी केली जातेय मात्र महापालिका प्रशासनाकडून खड्डे बुजवण्याचा काम करत नाही. काल रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास एक दुचाकीस्वार या रस्त्याने जात होता. या दुचाकीस्वाराचा तोल गेला व तो थेट शेजारून जात असलेल्या डम्परच्या मागच्या चाकाखाली आला. या अपघातात या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.
हे ही वाचा >> Kalyan: ‘नात माझ्याकडून सटकली अन् नाल्यात…’, ‘तेव्हा’ काय घडलं आजोबांनी सांगितलं!
खड्डे चुकवत असताना त्याचा तोल जाऊन तो डम्परच्या मागच्या चाकाखाली आल्याची आरोप प्रत्यक्षदर्शी पोलीस पाटील चेतन पाटील यांनी केला आहे. मयत दुचाकीस्वाराचे नाव सूरज गवारी असे असून तो कल्याण पूर्व रहिवासी असल्याचे सांगण्यात आले.
यंदाच्या पावसाळ्यात कल्याण-डोंबिवलीमध्ये अंतर्गत रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्ते दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांकडून सातत्याने केली जातेय. महापालिका प्रशासनाकडून खड्डे बुजवण्याचे काम केले जात नाही. खड्डे बुजवण्यात हलगर्जीपणा केले जात आहे, केडीएमसीचे सिटी इंजिनिअर रस्त्यावर उतरून फक्त मोठ्या मोठ्या बाता मारून स्टंटबाजी करत आहे. ठेकेदार, अधिकाऱ्यांवर कारवाई तसेच खड्ड्यांमुळे दुर्घटना घडल्यास संबंधित अभियंता आणि कंत्राटदाराला जबाबदार धरणार असल्याचे बोलले जात आहे.
हे ही वाचा >> Crime: गायक सापडला मुलीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत, दोघांना नग्नावस्थेत बेदम मारहाण
दरवर्षी प्रमाणे यावर्षी रस्त्यावर जास्ती खड्डे आहेत. हे खड्डे आता नागरिकांच्या जीवावर उठले असताना देखील खड्डे बुजवण्याचं काम केले जात नाही.
ADVERTISEMENT