Devendra Fadnavis News : यंदा आळंदीत वारकरी आणि पोलिसांत झटापट झाल्याचा प्रकार घडला. हा मुद्दा विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित करण्यात आला. यावर उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. देवेंद्र फडणवीसांनी लाठीमार झाल्याचा आरोप फेटाळून लावला. आळंदीत नेमकं काय घडलं, याबद्दलचा वृत्तांत त्यांनी सभागृहात सांगितला.
ADVERTISEMENT
विधान परिषदेत उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “एक मुद्दा आला की पहिल्यांदा तुम्ही वारकऱ्यांवर लाठीचार्ज केला. पण, ही वस्तुस्थिती नाहीये. महाराष्ट्रात कुठलंही सरकार आलं तरी वारकऱ्यांवर लाठीचार्ज सरकार कधी करत नसतं. ती करायची वेळही येऊ नये.”
वाचा >> ‘सॉरी, हॅप्पी बर्थडे पापा…’; तोंडावर पॉलिथीन… हातात दोरी, सुसाईड नोटने डोळ्यात पाणी
फडणवीस पुढे म्हणाले की, “मी आपल्याला एवढंच सांगतो की, मागच्या वर्षी मंदिरात आपण ज्यावेळेस सगळ्यांना प्रवेश दिला, त्यावेळी तिथे चेंगराचेंगरी झाली होती. काही महिलांच्या अंगावर महिला पडल्या आणि अडचण झाली. मग ते झाल्यानंतर या वर्षी त्याचं नियोजन कसं करायचं, यासंदर्भात एक बैठक झाली. ज्यामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी, आळंदी शहरातील प्रतिष्ठित ग्रामस्थ, 56 दिंड्यांचे प्रमुख आणि मंदिराचे विश्वस्त, अशी बैठक झाली.”
56 दिंड्यांना प्रत्येकी 75 पास
या बैठकीत झालेल्या निर्णयाबद्दल बोलताना फडणवीस यांनी सांगितले की, “त्या बैठकीत असं सांगण्यात आलं की, 56 दिंड्या ज्या आहेत, प्रत्ये 75 पास द्यायचे. त्यांना पहिल्यांदा प्रवेश द्यायचा. त्यानंतर मग उर्वरित प्रवेश सुरू करायचे, ते निघून गेल्यानंतर. असा एकत्रितपणे निर्णय झाला. त्यानंतर त्याप्रकारे 56 दिंड्यांचे 75-75 लोकं त्या भागात आतमध्ये असताना तिथे जे बॅरिकेट्स लावले होते. तिथे जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे आजी-माजी विद्यार्थी 300-400 संख्येने जमा झाले. त्यांनी आग्रह सुरू केला की आम्हालाही दर्शनालाही जाऊ द्या. त्यांना समजावण्याचा प्रयत्न झाला.”
वाचा >> रत्नागिरी : बँकेतून निघाली पण…, आधी गँगरेप नंतर… मृतदेह बघून पोलिसही ‘शॉक’
“त्याठिकाणी ह्यांचं झाल्यावर तुम्हाला प्रवेश देऊ, तुम्ही थांबा, असं सांगण्यात आलं. पोलिसांनी समजावलं, प्रतिष्ठित नागरिकांनी समजावलं. त्यानंतर ज्ञानेश्वर महाराज संस्थानाचे चोपदार आणि विश्वस्त, पालखी सोहळाप्रमुख असे सगळे त्याठिकाणी आले. त्यांनीही त्यांना सांगितलं की, हा सगळ्यांनी मिळून घेतलेला निर्णय आहे. त्यामुळे तुम्ही आता थांबा. तुम्ही घाई करू नका. ते काही ऐकायला तयार नव्हते. आणि शेवटी संपूर्ण शक्तिनिशी त्यांनी बॅरिकेट्स तोडले. ते त्याठिकाणी धावले. अक्षरशः पोलिसांच्या अंगावरून धावले. पोलीस मोठ्या प्रमाणात जखमी झाले”, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.
आळंदीत पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये काय घडलं?
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “पोलिसांनी तरीदेखील पुढे जाऊन थांबवलं आणि पुन्हा बॅरिकेट्सपर्यंत परत आणलं. त्याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारे एडीट करून टाकण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी स्वतः तिथले सीसीटीव्ही फुटेज रिलीज केलं. कुठेही कुणावरही त्याठिकाणी लाठीचार्ज झालेला नाही.”
Mumbai Tak Chavadi : जितेंद्र आव्हाडांनी कुणाला घाबरून दहीहंडी केली बंद?
“आपण बघितलं असेल, तर संस्थेतील एक माजी विद्यार्थी त्या प्रवेशाकरिता जमलेल्या विद्यार्थ्यांपैकी एक प्रमुख वारकरी विद्यार्थी सागर त्र्यंबक धोंडे हे स्वतः पोलीस ठाण्यात आले आणि त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे आणि मीडियासमोरही सांगितलेलं आहे की, पोलिसांनीही कुठलीही मारहाण केलेली नाही. त्यामुळे इथे अशा प्रकारची घटना झालेली नाही. हे खरं आहे की, एका वारकऱ्याला खरचटलं, पण तेही बॅरिकेट्स लागल्याने खरचटलं. चेंगराचेंगरी झाल्याने पोलिसांना लागलं. त्यामुळे मला हे सांगितलं पाहिजे की कुठल्याही परिस्थितीत वारकऱ्यांवर लाठीचार्ज झाला असं म्हणणं योग्य होणार नाही”, असं सांगत फडणवीसांनी वारकऱ्यांवरील लाठीचार्ज झाल्याचा आरोप फेटाळून लावला.
ADVERTISEMENT