Dombivali : मोबाईल वापरू नको, अभ्यासात लक्ष दे म्हटल्याच्या रागातून मुलीची थेट खाडीत उडी, पोलिसांनी...

मुंबई तक

• 03:16 PM • 17 Dec 2024

डोंबिवली पश्चिमेतील उमेशनगर परिसरात ही मुलगी आई-वडिलांसोबत राहत होती. मुलीचे वडील भाजीविक्रीचा व्यवसाय करतात. गुरुवारी 5 डिसेंबर रोजी दुपारी ही घटना घडली

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

आई रागावल्याचा मुलीला राग आला...

point

मुलीने थेट घरून निघत गाठली खाडी

डोंबिवलीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 15 वर्षीय विद्यार्थीनीने आत्महत्या केली. मोबाईल वापरू नको, अभ्यासात लक्ष असं म्हणत आई रागावल्यामुळे मुलीने डोंबिवलीतील माणकोली पुलावरून खाडीत उडी मारून आत्महत्या केली. दहा दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या मुलीचा मृतदेह रविवारी सायंकाळी खाडीजवळ आढळून आल्यानं हा प्रकार उघडकीस आला. 

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली पश्चिमेतील उमेशनगर परिसरात ही मुलगी आई-वडिलांसोबत राहत होती. मुलीचे वडील भाजीविक्रीचा व्यवसाय करतात. गुरुवारी 5 डिसेंबर रोजी दुपारी ही घटना घडली. तरुणी सतत मोबाईल फोन वापरत होती. यावेळी तिच्या आईने तिला मोबाईल फोनकडे जास्त लक्ष देऊ नको,  अभ्यासावर लक्ष केंद्रित कर असं सांगितलं.

 

हे ही वाचा >> Chhagan Bhujbal : "तुम्ही मला उठ आणि बस सांगणार असाल तर...", छगन भुजबळ संतापले, तुफान बरसले

 

आईच्या बोलण्याचं मुलीला इतकं वाईट वाटलं की, ती काहीही न सांगता घरातून निघून गेली. मुलगी आपल्या मैत्रिणीकडे गेली असावी, असं प्रथम कुटुंबीयांना वाटलं. मात्र, दुपारी गेलेली मुलगी संध्याकाळ होऊनही घरी न परतल्यानं तिचा शोध सुरू झाला. मात्र मुलगी कुठेच सापडली नाही. मुलगी बेपत्ता झाल्यानं वडिलांनी विष्णुनगर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.

 

हे ही वाचा >> 17 September 2024 Horoscope : लव्ह लाईफमध्ये 'या' राशीच्या लोकांना मिळेल यश! काहींच्या संपत्तीत होईल भरमसाठ वाढ

 

या प्रकरणाची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जी. बी. देवरे यांनी तातडीने तपास सुरू केला. दरम्यान, मोठगाव-माणकोली पुलावरून एका मुलीने उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी खाडीतील बोटीच्या माध्यमातून तरुणीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र ती सापडली नाही. दरम्यान, रविवारी सायंकाळी मोठगाव खाडीच्या काठावर मुलीचा मृतदेह वाहून आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला.

पोलिसांनी तातडीने मुलीच्या पालका बोलावून घेतलं. पालकांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेहाची ओळख पटवली. यानंतर पोलिसांनी कायदेशीर कारवाई करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. या घटनेनं सध्या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

    follow whatsapp