महाराष्ट्रात सध्या सर्वंच पक्ष लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीच्या तयारीला लागले आहेत. यासाठी सर्व पक्ष तयारी करत आहेत. अशात सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एका नेत्याला रडू कोसळलं आहे. हा व्यक्ती माजी मुख्यमंत्री राहिला आहे. या माजी मुख्यमंत्र्याला तिकीट नाकारल्यामुळे कार्यकर्त्यांसमोरच त्याच्या अश्रूंचा बांध फुटला आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे. (ex deputy chief minister thatikonda rajaiah gets emotional cry video viral telangana assembly election)
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना तेलंगणाची आहे. थाटीकोंडा राजैह हे भारत राष्ट्र समीती (बीआरएस) पक्षाचे नेते आहेत. थाटीकोंडा राजैह हे तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री आहेत. आगामी निवडणूकीत राजैह हे घणपुर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र बीआरएस पक्षाचे प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी थाटीकोंडा राजैह यांना तिकीट नाकारले होते. त्यामुळे राजैह नाराज झाले आणि पक्ष कार्यालयातून बाहेर पडले होते.
हे ही वाचा : Chandrayaan -3 : चंद्रयान मोहिमेचा तुम्हा-आम्हाला काय फायदा होणार?
या संपूर्ण घटनेनंतर राजैह कार्यालयातून बाहेर पडले आणि आंबेडकर स्टेच्यू सेंटवर पोहोचले होते. या ठिकाणी राजैह यांचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. हे कार्यकर्ते ‘जय राजैह, जय तेलंगणा’, अशा घोषणा देत होते. कार्यकर्त्यांना वाटले की राजैह यांना तिकीट मिळालंय त्यामुळे ते उत्साहाने घोषणा देत होते. या दरम्यान राजैह कार्यकर्त्यासमोर पोहोचताच त्यांच्या अश्रूचा बांध फुटला. राजैह कार्यकर्त्यांसमोरच ढसाढसा रडू लागले. राजैह यांनी यावेळी जमिनीवर लोटांगण घातले होते आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू कोसळत होते.
या सर्व घटनेनंतर आपल्या नेत्याला रडताना पाहून कार्यकर्त्यांनी राजैह यांना उचलले आणि त्यांच्या नावाच्या घोषणा देऊन त्यांच्यात उत्साह भरण्याचा प्रयत्न केला. यानंतर राजैह यांच्या हातात माईक दिला आणि त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले होते. या संदर्भातला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हे ही वाचा : Exclusive: Chandrayaan-3 Vikram लँडरने नुकतेच पाठवले चंद्राचे नवे फोटो!
दरम्यान के चंद्रशेखर राव यांनी नुकतीच सोमवारी 119 जागांसाठी 115 उमेदवारांच्या नावांची यादी जाहिर केली. यामधील गजवेल आणि कमरेड्डी या दोन जागांवरून के. चंद्रशेखर राव निवडणूक लढवणार आहेत. थाटीकोंडा राजैह यांच्या जागी कदीयाम श्रीहरी या नेत्याला चंद्रशेखर राव यांनी तिकीट दिले आहे. थाटीकोंडा राजैह यांच्यावर त्यांच्याच पक्षातील एका महिला सरपंचाने लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. या आरोपांमुळेच चंद्रशेखर राव यांना तिकीट नाकारल्याचे बोलले जात आहे.
ADVERTISEMENT