N.D. Mahanor News :
ADVERTISEMENT
ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे
आणि या मातीतूनी चैतन्य गावे
कोणती पुण्ये अशी येती फळाला
जोंधळ्याला चांदणे लगडून जावे
या ओळी कानावर पडल्या की आपसुकच आठवतात ते ना. धों. महानोर! काळ्या आईची सेवा करताना महानोरांनी निसर्ग सौंदर्याला शब्दांचा साज दिला आणि त्यांच्या कवितेनं ग्रामीण साहित्यात वेगळी छाप सोडली. रानकवी, निसर्ग कवी अशा शब्दात गौरवल्या गेलेल्या महानोरांची प्राणज्योत 3 ऑगस्ट रोजी मालवली. ते ८१ वर्षांचे होते. (Famous Marathi Poet N.D. Mahanor Passed Away)
ना.धों. महानोर यांच्यावर पुण्यातील रुबी क्लिनिक रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारी (3 ऑगस्ट) सकाळी साडेआठ वाजता निधन झाले. रुबी हॉल क्लिनिक मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात 20 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.
वाचा >> Nitin Desai: नि:शब्द शोकांतिका! धनुष्यबाण बनवला अन् मधोमध उभं राहून घेतला गळफास
ज्येष्ठ साहित्यिक ना.धों. महानोर यांचा जन्म 16 सप्टेंबर 1942 रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात असलेल्या पळखेडा या गावात झाला होता. त्यांचं शालेय शिक्षण पळसखेडा या गावामध्ये झाले. त्यानंतर त्यांनी जळगावमधील महाविद्यालयात पदवी शिक्षणासाठी प्रवेश घेतला, मात्र पहिल्या वर्षानंतर त्यांचं शिक्षण थांबलं. महानोरांनी शिक्षण सोडून शेतीकडे लक्ष दिले.
वाचा >> Mahavikas Aghadi Meeting: मविआ वज्रमुठ पुन्हा आवळणार, बैठकीत काय ठरलं?
शेतीबरोबर ना.धों. महानोर हे कवितांकडे वळले. महानोरांनी निसर्ग सौंदर्याला कवितांमधून शब्दबद्ध केलं. त्यांचे काही कवितासंग्रह लोकप्रिय झाले. ‘घन ओथंबून येती, बनांत राघू ओघिरती’, ‘आम्ही ठाकर ठाकर’, ‘चांद केवड्याच्या रात’, ‘चिंब पावसानं रान झालं’, ‘जांभुळ पिकल्या झाडाखाली’, ‘नभ उतरू आलं’ ही आणि यासारखी असंख्य गाणी त्यांनी लिहिली.
शरद पवार झाले भावूक, आठवणींना दिला उजाळा
महानोर यांच्या निधनाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शोक व्यक्त केला. ‘माझे जवळचे मित्र आणि महाराष्ट्राचा रानकवी ना. धों. महानोर यांच्या निधनाने मला अतिशय दुःख झाले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड खेड्यात गरीब शेतकरी कुटूंबात जन्मलेल्या ना. धों. चे बालपण कष्टात गेले पण कष्ट झेलताना त्यांचे संवेदनशील मन रानात रमले. तिथेच त्यांच्या सर्जनशीलतेला धुमारे फुटले”, अशा भावना शरद पवारांनी व्यक्त केल्या.
वाचा >> नितीन देसाईंची पंतप्रधान मोदी, शिंदेंना विनंती; 11 ऑडिओ क्लिपमध्ये काय?
“ना.धों. च्या कवितांनी रानातल्या कविता, पावसाळी कवितांनी , जैत रे जैत सारख्या अनेक चित्रपट गीतांनी मराठी माणसांच्या मनावर गारूड केले. ना.धों.ची विधान परिषदेतील भाषणे देखील माणसाच्या काळजाचा ठाव घेत”, असं शरद पवा म्हणाले आहेत.
“ना. धों. खूपच हळवे, त्यात पत्नीच्या निधनाने ते आणखी खचले. मी, प्रतिभा त्यांच्या खचलेल्या मनाला उभारी देत राहिलो. पण अखेर हा वृक्ष उन्मळून पडला. ना. धों.चे निधन देखील पावसाळ्याच्या दिवसांत व्हावे हा योग मनाला चटका लावून जाणारा आहे. मी आणि माझ्या कुटुंबांतर्फे या मृदू मनाच्या निसर्ग कवीला श्रद्धांजली अर्पण करतो”, अशा शब्दांत शरद पवारांनी महानोरांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
ADVERTISEMENT