Delhi : 6 मुलांच्या बापाने पत्नीला दिला तिहेरी तलाक अन् केलं ट्रान्सजेंडरशी लग्न

मुंबई तक

07 Mar 2023 (अपडेटेड: 23 Mar 2023, 08:39 PM)

नवी दिल्ली : राजधानीतील (Delhi) भजनपुरा भागात तिहेरी तलाकचं प्रकरण समोर आलं आहे. तिहेरी तलाकसोबतच पतीने ट्रान्सजेंडरशी लग्न केलं असल्याचही पिडीत महिलेचं म्हणणं आहे. या पिडीत महिलेच्या तक्रारीवरून आरोपी पतीविरुद्ध भजनपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आरोपी सध्या घटनास्थळावरून फरार असून पोलीस त्याच्या शोधात आहेत. (Father of 6 children married a transgender, […]

Mumbaitak
follow google news

नवी दिल्ली : राजधानीतील (Delhi) भजनपुरा भागात तिहेरी तलाकचं प्रकरण समोर आलं आहे. तिहेरी तलाकसोबतच पतीने ट्रान्सजेंडरशी लग्न केलं असल्याचही पिडीत महिलेचं म्हणणं आहे. या पिडीत महिलेच्या तक्रारीवरून आरोपी पतीविरुद्ध भजनपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आरोपी सध्या घटनास्थळावरून फरार असून पोलीस त्याच्या शोधात आहेत. (Father of 6 children married a transgender, gave triple talaq to his wife and threw her out of the house)

हे वाचलं का?

Crime News : अल्पवयीन मुलासोबत शारीरीक संबंध…व्हिडिओही बनला…महिला सापडली अडचणीत

पूर्व जिल्ह्याचे उपायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला भजनपुरा भागातील रहिवासी आहे. महिलेने तक्रारीत म्हटलं आहे की 32 वर्षांपूर्वी तिचं लग्न झालं होतं आणि तिला आता 6 मुलं आहेत. यात 4 मुली आणि 2 मुले आहेत. महिलेचा आरोप आहे की तिच्या पतीने तिला सोडून एका ट्रान्सजेंडरशी लग्न केले आहे. मात्र, सामाजिक दबावामुळे त्याने ट्रान्सजेंडरलाही सोडून दुसऱ्या महिलेशी लग्न केल्याचे सांगण्यात येत आहे.

हे लग्न झाल्यापासून पती तिच्यावर घर सोडण्यासाठी दबाव आणत होता आणि घर सोडलं नाही तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही देत होता. 7 जुलै 2022 रोजी तिच्या पतीने तिला तीन वेळा ‘तलाक तलाक तलाक’ म्हणत घर सोडण्यास सांगितले असा आरोप होतं आहे. दरम्यान, पीडितेला समुपदेशनासाठी क्राईम अगेन्स्ट वुमन सेलकडे पाठवण्यात आलं आहे. तसंच संबंधित महिलेच्या तक्रारीवरुन भजनपुरा पोलिस ठाण्यात मुस्लिम महिलांच्या विवाह हक्क संरक्षण कायद्याच्या कलम ४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Crime: मीरा रोड परिसर हादरला! चप्पलेवरून भांडण… शेजाऱ्याने जीवच घेतला

पीडित महिलेने सांगितलं की, नवरा तिच्यावर अत्याचार करतो आणि मुलांच्या संगोपनासाठी पैसेही देत नाही. तर त्याचवेळी, या प्रकरणात आरोपी पतीचे म्हणणं आहे की, पत्नीने लावलेले सर्व आरोप खोटे आहेत. आरोपीच्या म्हणण्यानुसार, त्याची पत्नी प्रॉपर्टीसाठी हे सर्व करत आहे. घर आपल्या नावावर करण्यासाठी पत्नी दबाव टाकत आहे. तिहेरी तलाकचा आरोप फेटाळून लावताना आफताब म्हणाला की, त्याने कधीही आपल्या पत्नीला तिहेरी तलाक दिला नाही आणि कधीही कोणत्याही प्रकारे त्रास दिला नाही. आरोपीचे म्हणणे आहे की, पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी जेणेकरून त्याला न्याय मिळेल.

    follow whatsapp