Crime : माजी मंत्र्याच्या सुनेचा मृतदेह बेडवर सापडला! महिलेनं नवरा आणि बॉयफ्रेंडसोबत रुममध्ये...

Uttar Pradesh Crime News : झांसीमध्ये एका महिलेच्या हत्येमुळं एकच खळबळ उडाली आहे. संगीता अहिरराव असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे.

Uttar Pradesh Crime Latest News

Uttar Pradesh Crime Latest News

मुंबई तक

• 05:55 PM • 22 Mar 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

माजी मंत्र्याच्या सूनेची हत्या का करण्यात आली?

point

बेडरुममध्ये घडलेली घटना पाहून पोलिसही हादरले!

point

काय आहे संपूर्ण प्रकरण?

Uttar Pradesh Crime News : झांसीमध्ये एका महिलेच्या हत्येमुळं एकच खळबळ उडाली आहे. संगीता अहिरराव असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. माजी मंत्री रतनलाल अहिरवार यांच्या भावाच्या सूनेची हत्या झाल्याची माहिती समोर आलीय. या महिलेची हत्या तिच्याच प्रियकराने केली. धक्कादायक बाब म्हणजे, हत्येच्या घटनेवेळी महिलेचा पतीही त्याठिकाणी हजर  होता. संगीताने तिचा पती रवींद्र अहिरवार आणि प्रियकर रोहित वाल्मिकसोबत घरातच दारूची पार्टी केली होती. याचदरम्यान, जबरदस्ती करण्याच्या प्रयत्नानंतर प्रियकराने महिलेचा गळा दाबून खून केला. पोलिसांनी याप्रकरणी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. 

हे वाचलं का?

काय आहे संपूर्ण प्रकरण?

महिलेच्या हत्येची घटना कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या लक्ष्मी गेट परिसरात घडली. संगीता अहिरराव तिचा पती रवींद्र आणि तीन मुलांसोबत इथे राहत होती. संगीताची मलुगी एंजलने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास रोहित वाल्मिक दारू घेऊन आला होता. त्यानंतर संगीता, रोहित आणि रवींद्र बेडरुममध्ये गेले आणि दरवाजा आतून बंद केला. त्यानंतर मुलांना दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यात आलं. एक तासानंतर मुलं जेव्हा घरी आली, त्यावेळी बेडरूममध्ये भांडण झाल्याचं आवाज आला.

हे ही वाचा >> Pune Crime : जन्मदात्या बापानं 3 वर्षाच्या मुलाला गळा चिरुन संपवलं, पत्नीच्या चरित्र्यावर...

संगीता जोराजोरात ओरडत होती आणि तिची मुलगी एंजलला बोलवत होती. घाबरलेल्या एंजलने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी रोहितने थोडासा दरवाजा उघडून तिला 100 रुपये देत बाहेर जायला सांगितलं. परंतु, एंजलने पैसे घेतले नाही. त्यानंतर रोहितने दरवाजा बंद केला आणि संगीतावर मारहाण सुरुच ठेवली. घाबरलेली एंजल तातडीनं घरच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या शकुंतलाकडे गेली आणि तिला या घटनेबाबत सर्व सांगितलं. त्यानंतर शकुंतलानेही दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. पण बेडरुममधून कोणताच प्रतिसाद येत नव्हता.

हे ही वाचा >> Nashik Crime : नाशिकमध्ये भरदिवसा मुलीचं अपहरण, व्हायरल CCTV व्हिडीओच्यामागे निघाली वेगळीच घटना

त्यानंतर शकुंतलाने 112 नंबरवर फोन करून पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि दरवाजा उघडला, तेव्हा बेडरूममधील नजारा पाहून पोलिसही हादरले. संगीताचा मृतदेह बेडवर पडला होता. बॉयफ्रेंड रोहित तिथेच बसला होता. तर पती रवींद्र सोफ्यावर झोपला होता. पोलिसांनी लगेच दोन्ही आरोपींना अटक केली. दरम्यान, पोलिसांनी संगीताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. पोलीस दोन्ही आरोपींकडे कसून तपास करत आहे. 

    follow whatsapp