G20 Summit 2023 : जी 20 च्या परिषदेसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Jo Biden) भारत भेटीवर आले आहेत. यावेळी त्यांचे दिल्लीविमान तळावर स्वागत करण्यात आले आहे. त्यांचे स्वागत करण्यासाठी एका लहान मुलीचा त्यामध्ये समावेश होता. त्यामुळे बायडेन यांचे स्वागत करणाऱ्या त्या मुलींच्या फोटोनी आता सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
ADVERTISEMENT
फोटो झाले व्हायरल
बायडेन यांच्यासोबत ज्या मुलीचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्या मुलीचे नाव माया आहे. अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी यांची ती मुलगी आहे. विमानतळावर बायडेन यांचे स्वागत होताच मायाने त्यांचे स्वागत केले आहे.
हे ही वाचा >> G20 Summit 2023: जो बायडेन यांचं विमानतळावर कोणी केलं स्वागत?, उलटसुलट चर्चांना उधाण
मायाच्या हाता बायबल
माया ही काही आजच प्रसिद्धीला आली आहे असं नाही तर गार्सेटी यांची मुलगी गार्सेटी यांनी भारतातील अमेरिकेचे राजदूत म्हणून शपथ घेतली होती. त्यावेळीही मायाचा एक फोटो प्रचंड व्हायरल झाला होता. या फोटोत माया हिब्रू बायबल हातात धरुन उभा होती. गार्सेटी यांनी शपथ घेताना या बायबलवरच शपथ घेतली होती.
ती कन्या नेहमीच चर्चेत
एरिक गार्सेटीबद्दल एक गोष्ट आता सर्वांना माहिती झाली आहे की, कोणत्याही मोठा कार्यक्रमामध्ये गार्सेटींची मुलगी माया नेहमीच त्यांच्यासोबत असते. माया जुआनिता गार्सेटी ही अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटी आणि त्यांची पत्नी एमी वीकलँड यांची एकलुती एक कन्या आहे. अमेरिकेतही निवडणूक रॅलीत किंवा मतदान केंद्रावरही गार्सेटी यांची मुलगी माया अनेकदा दिसली आहे. अमेरिकेचे भारतातील राजदूत म्हणून शपथ विधी घेतली तेव्हा त्यांची मुलगी बायबल हातात घेऊन आलेली साऱ्यांनी बघितली आहे.
बायडेन यांच्याबरोबर भेटीगाठी
अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायडेन जी 20 च्या परिषदेसाठी भारतात आले आहेत. त्यांचे भारतात आगमन झाल्यानंतर त्यांनी थेट पंतप्रधानांचे निवासस्थान असलेले लोककल्याण मार्गावर गेले होते. या वेळी या दोन्ही नेत्यांनी परिषदेच्या द्विपक्षीय चर्चा केली. त्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत आपण अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षांबरोबर अनेक मुद्यांवर चर्चा केली आहे.
हे ही वाचा >> Lok Sabha election 2024 : भाजपला मिळाला नवा मित्र, कर्नाटकात बदलणार समीकरणं
गार्सेटी कोण आहेत?
एरिक गार्सेटी हे अमेरिकेचे भारतातील राजदूत आहेत. त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. ते ऑक्सफर्ड विद्यापीठात रोड्स स्कॉलर होते आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्येही त्यांनी शिक्षण घेतले होते. त्यांनी युनायटेड स्टेट्स नेव्ही रिझर्व्हमध्ये अधिकारी म्हणूनही काम केले आहे. गार्सेट्टी जुलै 2013 ते डिसेंबर 2022 या काळात लॉस एंजेलिसचे महापौरपदी त्यांनी काम केले आहे. लॉस एंजेलिसचे पहिले ज्यू महापौर म्हणून त्यांची नियुक्ती झाली.
ADVERTISEMENT