Gautami Patil Video : गौतमी पाटील हे नाव आता महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचलं आहे. यामागे प्रमुख कारण म्हणजे गौतमीचा जिथे कार्यक्रम होतो, तिथे कुरबूर होतेच होते. मोजके अपवाद सोडले, तर गौतमीच्या कार्यक्रमात राडा होतोच. पण, आता गौतमीच्या कार्यक्रमातील एक व्हिडीओ व्हायरल होतोय. हा व्हिडीओ आहे अहमदनगर जिल्ह्यातील. गौतमीने स्टेजवरून खाली उतरून कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या महिला, मुलींसोबत ठेका धरला.
ADVERTISEMENT
संगमनेर तालुक्यातील म्हसवंडी (जि. अहमदनगर) येथे कला व सास्कृतिक महोत्सवाच्या निमित्ताने गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे शनिवारी (13 मे) आयोजन करण्यात आले होते. नेहमीच आपल्या डान्सनं सर्वांना घायाळ करणाऱ्या गौतमी पाटीलनं यावेळी थेट स्टेजवरून खाली उतरत महिला प्रेक्षकांमध्येच एंट्री घेतली.
गौतमीचा डान्स बघण्यासाठी महिला वर्ग देखील मोठ्या संख्येनं आला होता.गौतमीनं फिल्मी अंदाजात एंट्री घेताच महिलांनी देखील ठेका धरला. हा कार्यक्रम कुठलाही तंटा, भांडणे न होता निर्विघ्न पार पडला. त्यामुळे या कार्यक्रमाची चांगलीच चर्चा होऊ लागली आहे.
Video >> Gautami Patil च्या फॅन्सचा अतिउत्साह, घराचं छतच कोसळलं
म्हसवंडीत कला व सास्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. गौतमी पाटीलच्या आतापर्यंत जवळपास सर्व कार्यक्रमांमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालं. अनेक ठिकाणी तर कार्यक्रम मध्येच बंद करावा लागल्याचेही प्रकार घडले.
म्हसवंडीत संपूर्ण गावाने सहभाग घेत तिच्या कार्यक्रमाला दाद दिली. गौतमी नाचता नाचता मध्येच स्टेजवरून खाली उतरली. शाळा-कॉलेजात जाणाऱ्या मुली, महिला देखील गौतमीचा डान्स पाहण्यासाठी आल्या होत्या. गौतमीनं स्टेजवरून प्रेक्षकांमध्ये एंट्री घेतली. गौतमी खाली उतरताच महिला प्रेक्षकांमध्ये एकच उत्साह पाहायला मिळाला.
स्टेजवरून खाली उतरताच गौतमीनं चंद्रा गाण्यावर ठेका धरला. चंद्रा गाण्यावर बेधुंद नाचणाऱ्या गौतमीसमवेत शाळा-कॉलेजात शिकणाऱ्या मुली, लग्न झालेल्या महिला आणि वयस्कर महिलांनी ही ठेका धरत नाचायला सुरवात केली. त्यांना आवरताना घारगाव पोलिसांची तर दमछाक झाली.
हेही बघा >> अजितदादांनी घेतली गौतमी पाटीलची बाजू, म्हणाले, ‘ती बैलासमोर नाचेल किंवा…’
या कार्यक्रमासाठी पोलीस बंदोबस्त तसेच खाजगी बॉडीगार्ड यांचेही नियोजन केलं होतं. या कार्यक्रमात गौतमीसोबत गावातील तरुणाईसह चिमुकल्यांनीही ठेका धरला. यावेळी गौतमीने चिमुकल्यांना स्टेजवर बोलवत त्यांच्यासोबत डान्स केला. ग्रामस्थांच्या नियोजनामुळे गौतमी पाटीलचा कार्यक्रम शांततेत पार पडल्याने पोलिसांनीही सुस्कारा सोडला. या कार्यक्रमाचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.
ADVERTISEMENT