Gautami Patil: ‘तू होतीस का माझी परी..’, गौतमी पाटीलला कोणी घातली थेट लग्नाची मागणी?

मुंबई तक

30 May 2023 (अपडेटेड: 30 May 2023, 02:48 PM)

Guatami Patil Marriage Offer : प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलला एका शेतकरी पुत्राने लग्नाची मागणी घातली आहे. बीडच्या (Beed) एका शेतकरी पुत्राने आपल्या खास शैलीत तिला पत्र लिहून ही मागली घातलीय. तरूणाच्या या पत्राची आता सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

gautami patil marriage offer from beed boy sent letter of marriage proposal

gautami patil marriage offer from beed boy sent letter of marriage proposal

follow google news

Guatami Patil Marriage Offer : प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami patil) हिने काहीच महिन्यांपूर्वी प्रसिद्धी माध्यमांसमोर लग्न करण्याची इच्छा जाहिर केली होती. यासोबत तिला कसा नवरदेव हवाय याबाबतची देखील माहिती दिली होती.यानंतर आता गौतमी पाटीलला एका शेतकरी पुत्राने लग्नाची मागणी घातली आहे. बीडच्या (Beed) एका शेतकरी पुत्राने आपल्या खास शैलीत तिला पत्र लिहून ही मागली घातलीय. तरूणाच्या या पत्राची आता सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. (gautami patil marriage offer from beed boy sent letter of marriage proposal)

हे वाचलं का?

बीड (Beed) जिल्ह्याच्या केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील शेतकरी पुत्र रोहन गलांडे यांनी गौतमी पाटीलला (Gautami patil) लग्नाची मागणी घातली आहे. रोहन गलांडे यांनी त्यांच्या खास शैलीत पत्र लिहून गौतमीला ही मागणी घातली आहे. आता या पत्राची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. दरम्यान रोहनने या पत्रात नेमके काय लिहलंय ते जाणून घेऊयात.

हे ही वाचा : ‘महाराष्ट्राची संस्कृती बिघडवणाऱ्या…’, गौतमी पाटीलवर संभाजी राजेंचा यू-टर्न!

काय लिहिलंय पत्रात…

गौतमी पाटील (Gautami patil) तु भारी, तुझ्या घरी, पण तू होती का माझी परी, मी रोहन दादा गलांडे (पाटील), मी तुझ्या सोबत लग्न करायला तयार आहे, पत्र लिहण्यामागचं कारण एका मुलाखतीत तुला कसा जोडीदार हवाय हे सांगताना म्हणाली होतीक की, ‘आता मी २५ वर्षांची आहे. लग्न करून घरसंसार थाटावा अशी माझी इच्छा आहे. फक्त मला माझ्या इच्छेप्रमाणे जोडीदार हवा आहे. मला मान, सन्मान, प्रसिद्धी, पैसा नकोय. फक्त त्याने मला कोणत्याही परिस्थितीत साथ द्यायला हवी. मी लहानपणी मुलींच्या शाळेत शिकली. मला भाऊ नाही त्यामुळे पुरुष मंडळींशी माझा संबंध कधीच आला नाही. माझ्या संसाराचा भार आता एका पुरुषाने उचलावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. म्हणूनच मी आता लवकरच लग्न करण्याचा निर्णय घेणार आहे.’

तरी तुझ्या सर्व इच्छा अटी मला मान्य आहेत, मी रोहन दादा गलांडे( पाटील) मी तुझ्या सोबत लग्न करायला तयार आहे. तू जशी आहेस तशीच मला आवडली आहेस. जरी तुझ्या सोबत कुणी लग्नाला तयार नसले, तरी मी माणुसकीच्या नात्याने तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे. माझे वय २६ वर्ष आहे. मी एक शेतकरी पुत्र आहे.माझी शेती बागायती आहे, दुग्ध व्यवसाय आहे,तू जर माझ्यासोबत लग्नाला तयार असशील, तर तू मला भेटायला ये, पत्ता मु.पो.चिंचोली माळी तालुका केज , जिल्हा बीड. या पत्त्यावर तू मला भेटायला ये, मी तुझ्या सोबत लग्न करायला तयार आहे, असे रोहन गलांडे याने पत्रात लिहले आहे.

दरम्यान एका शेतकरी पुत्राने गौतमी पाटीलला (Gautami patil) लग्नाची मागणी घातली आहे. आता शेतकरी पुत्राची ही लग्नाची मागणी गौतमी पाटील स्विकारते का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

    follow whatsapp