Ghatkoper Hoarding Collapse : भावेश भिंडेने 'त्या' होर्डिंगसाठी झाडांनाही दिलं विष, वाचा Inside Story

मुंबई तक

14 May 2024 (अपडेटेड: 14 May 2024, 03:16 PM)

Ghatkoper Hoarding Collapse : घाटकोपर दुर्घटनेनंतर आता पोलिसांनी इगो मिडिया कंपनीचे मालक भावेश भिंडे विरोधात 304 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भावेश भिंडेवर याआधी अनेक गुन्हे दाखल आहेत. जानेवारी 2024 मध्ये भावेश भिंडे विरुद्ध मुलुंड पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल होता. पोलिसांनी या प्रकरणात भावेश भिंडे विरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.

ghatkoper hoarding collapse 14 people death fir filled against bhavesh bhinde mumbai politics udhhav thackeray nitesh rane

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी जाहिरात कंपनीचा मालक भावेश भिंडे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

follow google news

Ghatkoper Hoarding Collapse : दिपेश त्रिपाठी, मुंबई :  मुंबईत सोमवारी आलेल्या अवकाळी पावसाने घाटकोपरमधील महाकाय होर्डिंग कोसळल्याची दुदैवी घटना घडली होती. या घटनेत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 75 जण जखमी असल्याची माहिती आहे. या दुर्घटनेनंतर हे होर्डिंग अनधिकृत असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच हे होर्डिंग उभारण्यासाठी आजूबाजूच्या झाडांवर विषप्रयोग केल्याचाही धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. दरम्यान हे होर्डिंन (Ghatkoper Hoarding Case) नेमक्या कोणत्या कंपनीच्या मालकीचे होते आणि या कंपनीचा मालक नेमका कोण आहे? हे जाणून घेऊयात.  (ghatkoper hoarding collapse 14 people death fir filled against bhavesh bhinde mumbai politics udhhav thackeray nitesh rane) 

हे वाचलं का?

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी जाहिरात कंपनीचा मालक भावेश भिंडे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. भिंडे यांनी लोहमार्ग पोलिसांची परवानगी घेऊन हे होर्डिंग उभारले होते. तर महापालिकेच्या नियमांना धाब्याबर बसवले होते. त्यामुळे महापालिकेच्या नियमांना धाब्यावर बसवून हे होर्डिंग उभारण्यात आले होते. 

हे ही वाचा : "भाजपला बहुमत मिळणं कठीण", चव्हाणांनी सांगितलं 'इंडिया' किती जिंकेल जागा?

विशेष म्हणजे पालिकेच्या धोरणांमध्ये  40 बाय 40 म्हणजेच 1 हजार 600 चौरस फुट होर्डिंग उभारण्याची परवानगी आहे. पण जाहिरातदार कंपनीने 120 बाय 120 म्हणजेच 14,400 चौरस फुटाचे होर्डींग उभारले होते. तसेच हे होर्डिंग उभारताना आजूबाजूच्या झाडांवर विषप्रयोग करण्यात आला होता. काही झाडे तोडण्यात आली होती. यावेळी पालिकेने कंपनीला नोटीसही बजावली होती. मात्र तरीही कंपनीने होर्डिंग उभारलं होतं. 

दरम्यान या दुर्घटनेनंतर आता पोलिसांनी इगो मिडिया कंपनीचे मालक भावेश भिंडे विरोधात 304 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भावेश भिंडेवर याआधी अनेक गुन्हे दाखल आहेत. जानेवारी 2024 मध्ये भावेश भिंडे विरुद्ध मुलुंड पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल होता. पोलिसांनी या प्रकरणात भावेश भिंडे विरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.

भावेश भिंडेने 2009 मध्ये मुलुंडमधून अपक्ष उमेदवार म्हणून राज्याची निवडणूक लढवली होती. या प्रतिज्ञापत्रात त्याने त्याच्यावर 23 गुन्हे दाखल असल्याची माहिती दिली होती. ही सर्व प्रकरणे चेक बाऊन्ससाठी मुंबई महानगरपालिका कायदा आणि निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायद्यांतर्गत होती. भावेशने गेल्या काही वर्षात होर्डिंग्ज आणि बॅनर्ससाठी अनेक रेल्वे आणि बीएमसी कॉन्ट्रॅक्ट्स मिळवले होते. या दरम्यान त्याने महापालिका आणि रेल्वेच्या नियमांचे उल्लघन केल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. 

हे ही वाचा : Mumbai Tak Chavadi : '...तर मी दोन पक्ष, एक कुटुंबं फोडलं असतं'

भावेश भिंडे सुरुवातीला गुजू अॅडस नावाची कंपनी चालवत होता. या कंपनीवर अनेक गुन्हे दाखल झाल्यानंतर महपालिकेने त्याला काळ्या यादीत टाकले होते. त्यानंतर भिंडेने इगो मिडीयाच्या नावाने नवीन कंपनी स्थापन केली होती.त्यानंतर त्याने या कंपनीच्या नावावर कॉन्ट्रॅक्ट मिळवायला सुरूवात केली आहे. 

भावेश भिंडेवर बेकायदेशीरपणे वृक्षतोडीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. घाटकोपरचं होर्डिंग उभारण्यासाठी त्यांनी आजूबाजूच्या झाडांवर विषप्रयोग केला होता. तसेच त्याने बेकायदेशीपणे वृक्षतोडही केली होती. दरम्यान आता घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी भावेश भिंडेंवर 304 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास सुरू आहे. 

    follow whatsapp