डोंबिवली : वातावरणातील बदलामुळे मोठ्या प्रमाणात नाग, घोणस, अजगर आणि इतर प्राणी हे नैसर्गिक अधिवास सोडून भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीकडे वळत आहेत. तब्बल 11 फूट लांबीचा इंडियन रॉक पायथॉन जातीचा महाकाय अजगर डोंबिवलीतील रूनवाल गार्डन परिसरात आढळून आला आहे. गार्डन परिसरात महाकाय अजगर आढळून आल्याने अनेकांना धक्का बसला आहे.
ADVERTISEMENT
गार्डनमध्ये महाकाय अजगर
डोंबिवलीतील रूनवाल गार्डन परिसरातील हा महाकाय अजगर आल्याचे समजताच स्थानिक प्रणित पाटील यांच्याकडून या सापाची माहिती देण्यात आली. सेवा संस्थेचे सर्पमित्र गौरव कारंडे, पूर्वेश कोरी, ओमकार सामंत, निहार सकपाळ यांनी वनपरिक्षेत्र वनपाल राजू शिंदे यांच्या मदतीने नागरी वस्तीमध्ये शिरलेल्या सापाला मोठ्या शिताफीने पकडून जंगलात सोडले.
हे ही वाचा >> फ्लॅटचा दरवाजा उघडला अन्… रक्ताच्या थारोळ्यात बाप-लेकीचा मृतदेह, मुलगा फरार
प्राण्यांंनी सोडला अदिवास
काही दिवसांपूर्वी ठाण्यातही एक वेगळ्या प्रकारचा साप सापडला होता. त्यावेळी जंगील प्राण्यांची जोरदार चर्चा झाली होती. प्राण्यांनी आपला अदिवास सोडून शहरातील गजबजलेल्या ठिकाणी आपले स्थलांतर केल्याने प्राणीमित्रांकडून अनेक शक्यता वर्तवल्या जात आहेत. त्यामुळे रुनवाल गार्डमध्येही अजगर सापडल्यानंतरही अशीच जोरदार चर्चा करण्यात आली. यावेळी बघ्यांचीही मोठी गर्दी जमली होती.
प्राणीमित्रांनी घेतली धाव
या घटनेची माहिती सर्पमित्र आणि प्राणीमित्रांना दिल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर महाकाय अजगराला पकडून त्यांनी जंगल्यात सोडून दिला. डोंबिवलीतील प्रकारामुळे लोकांनी प्राण्यांविषयी आता सजग होते, सापांना न मारता त्याची माहिती आधी प्राणीमित्रांना देण्यात येत असल्याने त्यांचा जीव वाचत आहेत.
ADVERTISEMENT