IIT Bombay College Fest Girl Dance : आयआयटी बॉम्बेच्या एका फेस्टमध्ये भन्नाट डान्स केलेल्या एका तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. मुन्नी बदनाम गाण्यावर तरुणीचे ठुमके पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी अशाप्रकारच्या नृत्याला विरोध दर्शवला आहे. हा व्हिडीओ अश्लील असल्याचं काही नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. तर काहींनी या व्हिडीओत अश्लील काय आहे? असा सवाल उपस्थित करत पलटवार केला आहे. तरुणीने डान्स सुरु करताच काही विद्यार्थ्यांनीही ठुमके लावल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.
ADVERTISEMENT
सोशल मीडियावर झाला डिबेट
आयआयटी बॉम्बेचा नवा डान्स व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. सलमान खानच्या दंबग चित्रपटातील मुन्नी बदनाम गाण्यावर तरुणी थिरकल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. व्हिडीओत पाहू शकता की, सर्व मुलांनी सेम ड्रेसकोड घालून डान्स करण्याचा आनंद लुटला आहे. विद्यार्थ्यांचं डान्स पाहून तमाम नेटकरी थक्क झाले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच काही नेटकऱ्यांनी या व्हिडीओला विरोध दर्शवला आहे. या व्हिडीओला विद्यार्थ्यांचा मान सन्मान कमी झाला आहे, अशाप्रकारच्या प्रतिक्रियाही इंटरनेटवर उमटल्या आहेत.
हे ही वाचा >> Maharashtra Weather : महाराष्ट्रावर संकटाचं सावट! नेमकी कुठे काय स्थिती?
व्हायरल व्हिडीओला नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया
या तरुणीच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. काही लोकांनी हा व्हिडीओ अनैतिक स्वरुपाचा असल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी म्हटलंय की, हे कॉलेज जीवनातील मजेशीर दिवस आहेत. @Theboysthing नावाच्या ट्वीटर हँडलवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
व्हिडीओ पाहिल्यानंतर एका यूजरने म्हटलं, डान्सबाबत बोलायचं झालं तर यात काहीच अश्लील नाही. दुसऱ्या यूजरने म्हटलं, जर तुम्हाला हा व्हिडीओ अश्लील वाटत असेल, तर मुंबई फिल्म स्टुडिओसमोर निदर्शने करा. तिसऱ्या यूजरने म्हटलं, आजची पिढी कुठे चालली आहे? तर चौथ्या यूजरने म्हटलं, हे खूप सामान्य आहे. आताच्या दिवसात प्रत्येक कॉलेजमध्ये असं काही पाहायलं मिळतं.
ADVERTISEMENT