kolhapur gokul dudh sangh meeting : गोकुळ जिल्हा दूध महासंघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेवेळी प्रचंड गोंधळ उडाला. कागलमधील महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यात ही बैठक आयोजित केली गेली. पण, यावेळी महाडिक समर्थकांनी सत्ताधाऱ्यांवर आरोप गोंधळ घातला. यावेळी बॅरिकेट्स तोडण्याचा प्रयत्न महाडिक समर्थकांकडून झाला.
ADVERTISEMENT
गोकुळ दूध महासंघाच्या बैठकीआधीच महाडिक गटाच्या वतीने सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले गेले. सकाळी सभा सुरू झाल्यानंतर महाडिक गटाच्या सभासदांनी गर्दी केली. सत्ताधाऱ्यांनी सर्वसाधारण सभेत जे ठरावधारक बसवलेत, ते बोगस असल्याचा आरोप करण्यात आला.
बॅरिकेट्स तोडण्याचा प्रयत्न, गेटवरून उड्या
सभासदांना प्रवेश देण्यासाठी रांगा लावल्या गेल्या. महत्त्वाचं म्हणजे पाण्याच्या बाटल्याही आत नेण्यास बंदी घालण्यात आली. यावरून महाडिक गटाचे सभासद आक्रमक झाले. प्रचंड फौजफाटा लावण्यात आला होता. पण, महाडिक समर्थकांनी बॅरिकेट्स तोडण्याचा प्रयत्न केला. काही सभासद गेटवरून उड्या मारून आत गेले.
शौमिका महाडिक म्हणाल्या…
गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी सतेज पाटील गटावर टीका केली. त्या म्हणाल्या, “आतमध्ये जे सभासद आहेत, ते निम्म्यापेक्षा जास्त बोगस आहेत. झेरॉक्स कॉपी घेऊन आलेले आहेत. मला असंही सांगण्यात आलं की, इथेच त्यांना झेरॉक्स वाटण्यात आले. त्यामुळे आतले निम्मे ठरावधारक बोगस आहेत.”
हेही वाचा >> NCP Election Commission : ‘तो’ प्रश्न अन् अजित पवार चिडले, पुण्यात काय घडलं?
“बाहेर जे थांबलेले आहेत. ते सभासद अजून आत आलेले नाहीत. ते लाईनमध्ये आहेत. यापूर्वी असं कधीही झालं नव्हतं. ही अशी पद्धत नसते. बॅरिकेट्स लावण्याची पद्धत नाही. याचा अर्थ खऱ्या सभासदांनी येऊन प्रश्न विचारायला नको हेच तुम्हाला हवं होतं. म्हणून ही सगळी यंत्रणा लावलेली आहे. तेच कशाला घाबरलेत माहिती नाही. त्यांनी सभा चालू केलीये. सभासद बाहेर आहेत”, असं त्या म्हणाल्या.
हेही वाचा >> Mumbai : “घरकाम ही केवळ पत्नीची जबाबदारी नाही”, हायकोर्टाने पतीला झापलं
महाडिक गटाचा आरोप काय?
‘गोकुळमधील सत्ताधार्यांकडून मनमानीपणे कारभार सुरू आहे. निव्वळ राजकीय द्वेषातून काही दूध संस्थांना जाणीवपूर्वक त्रास दिला जातोय. सत्ताधार्यांच्या मनमानीला कंटाळून दूध उत्पादक आणि स्थानिक संस्था दुसर्या दूध संघांकडं वळत आहेत. संघाच्या सभासद संस्था वाढल्या, मग दूध संकलनात घट का झालीय? पूर्वीच्या संचालक मंडळानं बँकेत ठेवलेल्या ठेवी मोडण्याची वेळ का आली? गेल्या वर्षात तब्बल 32 कोटी रूपयांच्या ठेवी मोडल्या आहेत”, असा आरोप शौमिका महाडिक यांचा आहे.
ADVERTISEMENT