Gold Price : दसऱ्यानंतर खरंच सोनं महागलं? 10 ग्रॅम सोन्याचे भाव पाहा एका क्लिकवर

रोहिणी ठोंबरे

• 10:21 AM • 14 Oct 2024

Gold Rate Today 14 Oct 2024 : सणासुदीच्या दिवसात सोन्याला चांगलीच झळाळी आली आहे. नुकताच दसऱ्याचा सण जल्लोषात पार पडला. यावेळी सोन्याने नवा उच्चांक गाठल्याचं चित्र पाहायला मिळालं.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

सणासुदीच्या दिवसात सोन्याला चांगलीच झळाळी

point

आज सोने-चांदीच्या किंमतीत कितीने बदल?

point

तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?

Gold Rate Today 14 Oct 2024 : सणासुदीच्या दिवसात सोन्याला चांगलीच झळाळी आली आहे. नुकताच दसऱ्याचा सण जल्लोषात पार पडला. यावेळी सोन्याने नवा उच्चांक गाठल्याचं चित्र पाहायला मिळालं. अशा परिस्थिती आता दसऱ्यानंतर सोन्याचे भाव वाढले की घटले असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला तर मग आजच्या (14 ऑक्टोबर 2024) सोने-चांदीच्या किंमतीत कितीने बदल झाले हे एका क्लिकवर पाहूयात. (Gold-Silver prices down after dussehra what are the rates of 24 22 and 18 carat gold today 14 october 2024 in maharashtra)

हे वाचलं का?

भारतात सोने-चांदीच्या किमती गगनाला भिडलेल्या पाहायला मिळत आहेत. पण आज थोड्या का होईना सोन्याच्या किंमती घसरल्या आहेत. देशातील मोठ्या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,000 रुपयांच्या पुढे व्यापार करत आहे. हा वाढता दर सोने बाजारासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. सोन्याच्या किंमतीत होणाऱ्या या वृद्धीचा परिणाम बाजारातील अस्थिरता आणि जागतिक आर्थिक घडामोडींवर दिसून येत आहे.

Goodreturns वेबसाईटनुसार, रविवारी (13 ऑक्टोबर 2024) 24 कॅरेट 10 ग्रॅम (1 तोळा) सोन्याचा भाव 77,670 रूपयांवर पोहोचला होता. पण आज यामध्ये 50 रूपयांनी घट झाली असून याची किंमत 77,620 रूपये झाली आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा भाव 71,200 रूपये होता. त्यातही 50 रूपयांनी घसरण झाली असून त्याची किंमत 71,150 रूपये झाली आहे. त्याचबरोबर एक किलो चांदीची किंमत 97,000 रूपयांवर पोहोचली आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे भारतात सोने-चांदीच्या दागिन्यांच्या किंमती बदलत असतात.

सोन्या-चांदीच्या दरांमध्ये रोज बदल होत असतात. कधी सोन्या-चांदीच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळते. आगामी काळात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची भीती असल्याने सोन्याच्या दागिन्यांची मागणी 50 टक्क्यांनी वाढली आहे. 

तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?

मुंबई

10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 71,150 रूपये आहे.
10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,620 रूपये आहे. 
10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 58,220 रूपये आहे.

पुणे

10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 71,150 रूपये आहे.
10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,620 रूपये आहे. 
10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 58,220 रूपये आहे.

नागपूर

10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 71,150 रूपये आहे.
10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,620 रूपये आहे. 
10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 58,220 रूपये आहे.

नाशिक

10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 71,180 रूपये आहे.
10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,650 रूपये आहे. 
10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 58,250 रूपये आहे.

22 आणि 24 कॅरेट सोन्यामधील फरक काय?

सोन्याची शुद्धता प्रामुख्याने कॅरेट (K) मध्ये मोजली जाते. दागिन्यांच्या तुकड्यामध्ये किंवा सोन्याच्या वस्तूमध्ये किती शुद्ध सोने समाविष्ट आहे हे कॅरेट प्रणाली दर्शवते. भारतातील सर्वात लोकप्रिय कॅरेट मूल्ये 24, 22, 18 आणि 14 आहेत. शुद्ध सोने 24k मानले जाते, ज्यामध्ये 99.9% सोने असते, तर उर्वरित कॅरेटमध्ये तांबे किंवा चांदीसारख्या मिश्र धातुंचा समावेश होतो.

22 कॅरेट सोने, चांदी, निकेल, जस्त आणि तांबे यासह इतर मिश्रधातूंचे दोन भाग एकत्रित करणारे सोन्याचे मिश्रण आहे. 22 कॅरेट सोने हे 24 कॅरेट सोन्यानंतरचे सर्वोत्तम दर्जाचे आहे. तर, 24 कॅरेट सोने हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ग्राहकांना किंवा ज्वेलर्ससाठी उपलब्ध असलेले सर्वात शुद्ध सोने आहे. 24-कॅरेट सोन्यामध्ये तांबे, निकेल, जस्त किंवा चांदी यांसारख्या मिश्र धातुंसह 99.99% सोने असते.

    follow whatsapp