Gold Price Today : सोन्या-चांदीच्या भावात दररोज सातत्याने वाढ होत आहे. अशावेळी सणासुदीच्या ऐन मुहूर्तावर सोन्याने उच्चांक गाठला आहे. दिवाळीचा सण तोंडावर आलेला असताना सोन्याच्या दराने सर्व रेकॉर्ड मोडून काढले आहेत. अशा परिस्थितीत आज (21 ऑक्टोबर 2024) या किंमतीत कितीने बदल झाले आहेत जाणून घेऊया. (Gold-Silver prices have increased tremendously before diwali festival what are the rates of 24 22 and 18 carat today 21 october 2024)
ADVERTISEMENT
भारतात सोने-चांदीच्या किंमती गगनाला भिडलेल्या पाहायला मिळत आहेत. पण आज थोडं का होईना यामध्ये बदल झाला आहे. देशातील मोठ्या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,000 रुपयांच्या पुढे व्यापार करत आहे. हा वाढता दर सोने बाजारासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. सोन्याच्या किंमतीत होणाऱ्या या वृद्धीचा परिणाम बाजारातील अस्थिरता आणि जागतिक आर्थिक घडामोडींवर दिसून येत आहे.
Goodreturns वेबसाईटनुसार, रविवारी (20 ऑक्टोबर 2024) 24 कॅरेट 10 ग्रॅम (1 तोळा) सोन्याचा भाव 79,420 रूपयांवर पोहोचला होता. आज यामध्ये 200 रूपयांनी वाढ झाली असून याची किंमत 79,640 रूपये झाली आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा भाव 72,800 रूपये होता. त्यातही 200 रूपयांनी वाढ झाली असून त्याची किंमत 73,000 रूपये झाली आहे. त्याचबरोबर एक किलो चांदीची किंमत 1,01,000 रूपयांवर पोहोचली आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे भारतात सोने-चांदीच्या दागिन्यांच्या किंमती बदलत असतात.
सोन्या-चांदीच्या दरांमध्ये रोज बदल होत असतात. कधी सोन्या-चांदीच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळते. आगामी काळात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची भीती असल्याने सोन्याच्या दागिन्यांची मागणी 50 टक्क्यांनी वाढली आहे.
हेही वाचा : BJP Candidate List : भाजपने संधी दिलेल्या 'त्या' 13 लाडक्या बहिणी कोण? यादीत कुणाची नावं?
तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?
मुंबई
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 73,000 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 79,640 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 59,730 रूपये आहे.
पुणे
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 73,000 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 79,640 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 59,730 रूपये आहे.
नागपूर
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 73,000 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 79,640 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 59,730 रूपये आहे.
नाशिक
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 73,030 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 79,670 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 59,760 रूपये आहे.
22 आणि 24 कॅरेट सोन्यामधील फरक काय?
सोन्याची शुद्धता प्रामुख्याने कॅरेट (K) मध्ये मोजली जाते. दागिन्यांच्या तुकड्यामध्ये किंवा सोन्याच्या वस्तूमध्ये किती शुद्ध सोने समाविष्ट आहे हे कॅरेट प्रणाली दर्शवते. भारतातील सर्वात लोकप्रिय कॅरेट मूल्ये 24, 22, 18 आणि 14 आहेत. शुद्ध सोने 24k मानले जाते, ज्यामध्ये 99.9% सोने असते, तर उर्वरित कॅरेटमध्ये तांबे किंवा चांदीसारख्या मिश्र धातुंचा समावेश होतो.
हेही वाचा : Bollywood Actress: भारताची सर्वात श्रीमंत अभिनेत्री कोण? 4600 कोटींचं नेटवर्थ, नाव वाचून थक्कच व्हाल
22 कॅरेट सोने, चांदी, निकेल, जस्त आणि तांबे यासह इतर मिश्रधातूंचे दोन भाग एकत्रित करणारे सोन्याचे मिश्रण आहे. 22 कॅरेट सोने हे 24 कॅरेट सोन्यानंतरचे सर्वोत्तम दर्जाचे आहे. तर, 24 कॅरेट सोने हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ग्राहकांना किंवा ज्वेलर्ससाठी उपलब्ध असलेले सर्वात शुद्ध सोने आहे. 24-कॅरेट सोन्यामध्ये तांबे, निकेल, जस्त किंवा चांदी यांसारख्या मिश्र धातुंसह 99.99% सोने असते.
ADVERTISEMENT