Maharashtra Rain Alert : सध्या ऑक्टोबरमध्येही पावसाची रिमझिम सुरुच आहे. आजही राज्यात पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. अशात महाराष्ट्रावर दुहेरी संकट घोंगावतंय त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांना महत्त्वाचा अलर्ट जारी केला आहे. तुमच्या शहरात आज (21 ऑक्टोबर 2024) वातावरण कसं असणार आहे चला जाणून घेऊया. (maharashtra weather forecast rain alert to these districts october heat IMD report today 21 october 2024)
ADVERTISEMENT
एकीकडे महाराष्ट्रातील काही भागांना ऑक्टोबर हिटचा तडाखा जाणवत असताना दुसरीकडे, अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. IMD ने दिलेल्या अंदाजानुसार, मुंबई आणि उपनगरात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसांच्या सरींची शक्यता आहे, तसेच पुढील 24 तास ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे.
हेही वाचा :
महाराष्ट्रावर दुहेरी संकट कोणते?
एकीकडे मुसळधार पाऊस तर दुसरीकडे राज्यातील काही भागांमध्ये सोसाट्याचा वारा आणि विजांचा कडकडाट असं दुहेरी संकट असणार आहे. काही जिल्ह्यांना तर गारपीट होण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
मराठवाडा आणि विदर्भातही आज जोरदार पावसाची शक्यता आहे, बीड, हिंगोली, नांदेड, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये आज जोरदार पावसाचा अंदाज आहे.
हेही वाचा :
आज कोकणामधील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड या जिल्ह्यांमध्ये तर मध्य महाराष्ट्रात पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नंदुरबार, धुळे , जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, मराठवाड्यामधील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड आणि बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
ADVERTISEMENT