Viral Video : ऐकावं ते नवलच! पोरांनो दाढी ठेवा किंवा गर्लफ्रेंड, पोरी चक्क रस्त्यावरच उतरल्या, घडलंय तरी काय?

'No Clean Shave, No Love, Girls Rally Video Viral : जगभरात अनेक गोष्टींसाठी वेगवेगळ्या पद्धतीनं मोर्चे काढले जातात. कधी न्याय मिळवण्यासाठी, तर कधी सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी मोर्चांचं हत्यार उपसलं जातं.

girls shocking rally for clean shaven boyfriends

indian girls shocking rally for clean shaven boyfriends

मुंबई तक

• 03:24 PM • 19 Oct 2024

follow google news

बातम्या हायलाइट

point

दाढी ठेवणाऱ्या मुलांविरोधात मुलींचा भन्नाट मोर्चा

point

मुलींच्या रॅलीचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

point

दाढी लावून मोर्चा काढणाऱ्या मुलींचा व्हिडीओ पाहून सर्वच झाले थक्क

'No Clean Shave, No Love, Girls Rally Video Viral : जगभरात अनेक गोष्टींसाठी वेगवेगळ्या पद्धतीनं मोर्चे काढले जातात. कधी न्याय मिळवण्यासाठी, तर कधी सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी मोर्चांचं हत्यार उपसलं जातं. पण नुकतच व्हायरल झालेल्या मोर्चाच्या एका व्हिडीओनं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. पुरुषांच्या दाढीविरोधात काही मुलींनी चक्क रस्त्यावर उतरून मोर्चा काढल्याचं एका व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे. हा मुलींच्या रॅलीचा व्हिडीओ इंदोरचा असल्याची चर्चा आहे. 

हे वाचलं का?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत पाहू शकता की, काही मुलींनी एक रॅली काढली आहे. तसं पाहिलं तर ही रॅली सामान्य स्वरुपाची वाटते. पण मुलींच्या घोषणा आणि त्यांच्या हातात असलेले कार्डबोर्ड पाहिल्यावर तुम्हीही थक्क झाल्याशिवाय राहणार नाहीत.खरंतर या मुलींनी क्लिन शेव बॉयफ्रेंडसाठी रॅली काढली. पण या रॅलीदरम्यान मुलींच्या हातात असलेल्या कार्डबोडनं अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. कारण या कार्डबोर्डवर भन्नाट मेसेज लिहिण्यात आले आहेत. नो क्लिन शेव, नो लव्ह, दाढी काढा किंवा गर्लफ्रेंड ठेवा. चॉईस तुमची. 

हे ही वाचा >>  कसोटीत सर्फराज खाननं ठोकलं पहिलं शतक! 16 चौकार अन् 3 गगनचुंबी षटकार...'असा' Video कधी पाहिला नसेल

व्हिडीओत पाहू शकता की, रॅलीत सहभागी झालेल्या मुलींनी त्यांच्या चेहऱ्यावर सांकेतिक पद्धतीने दाढी लावलीय.  रॅलीदरम्यान या मुली जोरजोरात घोषणाही देत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. मुलींचा अनोखा मोर्चा पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला असेल, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवरून शेअर करण्यात आला आहे.

इथे पाहा मुलींच्या रॅलीचा भन्नाट व्हिडीओ

पण ही रॅली मजेशीर व्हिडीओसाठी, लोकांचं मनोरंजन करण्यासाठी की प्रमोशनल शूटसाठी काढली? याबाबत कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती समोर आली नाही. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर तमाम नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. एका यूजरने कमेंट करत म्हटलंय, मुलींची मागणीही रास्त आहे. शेविंग केल्यानंतर काही मुलांचं वेगळच रुप पाहायला मिळू शकतं. एका अन्य यूजरने म्हटलं, या आंदोलनाने माझे डोळे उघडले. 

    follow whatsapp