Today Gold Rates : सोन्याचे भाव बघूनच भरेल धडकी; दिवसा दुप्पट तर, रात्री चौपट!

रोहिणी ठोंबरे

22 Oct 2024 (अपडेटेड: 22 Oct 2024, 01:27 PM)

Today Gold Price : देशात सोन्या-चांदीच्या किंमती वाढतच चालल्या आहेत. सणासुदीला सुरुवात होताच सोन्याच्या दरात तुफान वाढ होत आहे. दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आलेला असताना सध्या सोन्याच्या भावाने उच्चांक गाठला आहे.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

सोन्याच्या दरात तुफान वाढ

point

दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आलेला असताना सोन्याने उच्चांक गाठला

point

तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?

Gold-Silver Prices Today : देशात सोन्या-चांदीच्या किंमती वाढतच चालल्या आहेत. सणासुदीला सुरुवात होताच सोन्याच्या दरात तुफान वाढ होत आहे. दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आलेला असताना सध्या सोन्याच्या भावाने उच्चांक गाठला आहे. आज (22 ऑक्टोबर 2024) या किंमतीत कितीने बदल झाले आहेत सविस्तर जाणून घ्या. (Gold-Silver prices hike before diwali festival what are the rates of 24 22 and 18 carat today 22 october 2024 mumbai pune nashik)

हे वाचलं का?

देशातील मोठ्या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 78,000 रुपयांच्या पुढे व्यापार करत आहे. हा वाढता दर सोने बाजारासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. सोन्याच्या किंमतीत होणाऱ्या या वृद्धीचा परिणाम बाजारातील अस्थिरता आणि जागतिक आर्थिक घडामोडींवर दिसून येत आहे.

सोन्या-चांदीच्या दरांमध्ये रोज बदल होत असतात. कधी सोन्या-चांदीच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळते. आगामी काळात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची भीती आहे.

हेही वाचा Maharashtra Weather : महाराष्ट्रावर संकटाचं सावट! नेमकी कुठे काय स्थिती?

Good returns वेबसाईटनुसार, सोमवारी (21 ऑक्टोबर 2024) 24 कॅरेट 10 ग्रॅम (1 तोळा) सोन्याचा भाव 79,640 रूपयांवर पोहोचला होता. आज यामध्ये 10 रूपयांनी वाढ झाली असून याची किंमत 79,650 रूपये झाली आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा भाव 73,000 रूपये होता. त्यातही 10 रूपयांनी वाढ झाली असून त्याची किंमत 73,010 रूपये झाली आहे. त्याचबरोबर एक किलो चांदीची किंमत 1,01,100 रूपयांवर पोहोचली आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे भारतात सोने-चांदीच्या दागिन्यांच्या किंमती बदलत असतात.

तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?

मुंबई

10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 73,010 रूपये आहे.
10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 79,650 रूपये आहे. 
10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 59,740 रूपये आहे.

पुणे

10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 73,010 रूपये आहे.
10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 79,650 रूपये आहे. 
10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 59,740 रूपये आहे.

नागपूर

10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 73,010 रूपये आहे.
10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 79,650 रूपये आहे. 
10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 59,740 रूपये आहे.

नाशिक

10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 73,040 रूपये आहे.
10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 79,680 रूपये आहे. 
10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 59,770 रूपये आहे.

22 आणि 24 कॅरेट सोन्यामधील फरक काय?

सोन्याची शुद्धता प्रामुख्याने कॅरेट (K) मध्ये मोजली जाते. दागिन्यांच्या तुकड्यामध्ये किंवा सोन्याच्या वस्तूमध्ये किती शुद्ध सोने समाविष्ट आहे हे कॅरेट प्रणाली दर्शवते. भारतातील सर्वात लोकप्रिय कॅरेट मूल्ये 24, 22, 18 आणि 14 आहेत. शुद्ध सोने 24k मानले जाते, ज्यामध्ये 99.9% सोने असते, तर उर्वरित कॅरेटमध्ये तांबे किंवा चांदीसारख्या मिश्र धातुंचा समावेश होतो.

हेही वाचा : Horoscope In Marathi : 'या' राशीच्या लोकांची LOVE LIFE चमकणार! पण काही राशींना मिळेल धोका

22 कॅरेट सोने, चांदी, निकेल, जस्त आणि तांबे यासह इतर मिश्रधातूंचे दोन भाग एकत्रित करणारे सोन्याचे मिश्रण आहे. 22 कॅरेट सोने हे 24 कॅरेट सोन्यानंतरचे सर्वोत्तम दर्जाचे आहे. तर, 24 कॅरेट सोने हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ग्राहकांना किंवा ज्वेलर्ससाठी उपलब्ध असलेले सर्वात शुद्ध सोने आहे. 24-कॅरेट सोन्यामध्ये तांबे, निकेल, जस्त किंवा चांदी यांसारख्या मिश्र धातुंसह 99.99% सोने असते.

    follow whatsapp