Gold Price Today: सोन्याला आली तुफान झळाळी! चांदीचीही चमक प्रचंड वाढली;  पाहा आजचे भाव...

रोहिणी ठोंबरे

• 12:41 PM • 12 Sep 2024

Gold-Silver Price Today : सणासुदीच्या काळात भारतात मोठ्या प्रमाणात सोने खरेदी होत असते. गणेशोत्सवात सोने आणि चांदी या दोन्ही धातूने या महिन्यात चांगलीच आघाडी घेतली.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

सणासुदीच्या काळात भारतात मोठ्या प्रमाणात सोने खरेदी

point

गणेशोत्सवात सोने आणि चांदी या दोन्ही धातूंची आघाडी

point

तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?

Gold-Silver Price Today : सणासुदीच्या काळात भारतात मोठ्या प्रमाणात सोने खरेदी होत असते. तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जरा थांबा... कारण, गणेशोत्सवात सोने आणि चांदी या दोन्ही धातूने या महिन्यात चांगलीच आघाडी घेतली. सोन्याने पुन्हा एकदा उच्चांक गाठला आहे. अशावेळी आजचे भाव कितीने वाढले सविस्तर जाणून घेऊया. (gold-silver prices hike on today 12 september 2024 in maharashtra mumbai pune know the details)

हे वाचलं का?

सोन्या-चांदीच्या दरांमध्ये रोज बदल होत असतात. कधी सोन्या-चांदीच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळते. आज गुरूवारी (12 सप्टेंबर 2024) सोन्याच्या दरात थोडी घसरण झाली आहे. तर चांदीचे भाव कालच्या तुलनेत सारखेच आहेत.

Goodreturns वेबसाईटनुसार, बुधवारी (11 सप्टेंबर 2024) 24 कॅरेट 10 ग्रॅम (1 तोळा) सोन्याचा भाव 73, 250 रूपयांवर पोहोचला होता. आज यामनध्ये 100 रूपयांनी घसरण झाली असून 73,150 रूपये किंमत झाली आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा भाव 67,050 रूपये झाला आहे. त्याचबरोबर एक किलो चांदीची किंमत 86,500 रूपयांवर पोहोचली आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे भारतात सोने दागिन्यांच्या किंमती बदलत असतात.

तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?

मुंबई

10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 67,050 रूपये आहे.
10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,150 रूपये आहे. 
10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 54,860 रूपये आहे.

पुणे

10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 67,050 रूपये आहे.
10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,150 रूपये आहे. 
10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 54,860 रूपये आहे.

नागपूर

10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 67,050 रूपये आहे.
10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,150 रूपये आहे. 
10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 54,860 रूपये आहे.

नाशिक

10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 67,080 रूपये आहे.
10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,180 रूपये आहे. 
10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 54,890 रूपये आहे.

22 आणि 24 कॅरेट सोन्यामधील फरक काय?

सोन्याची शुद्धता प्रामुख्याने कॅरेट (K) मध्ये मोजली जाते. दागिन्यांच्या तुकड्यामध्ये किंवा सोन्याच्या वस्तूमध्ये किती शुद्ध सोने समाविष्ट आहे हे कॅरेट प्रणाली दर्शवते. भारतातील सर्वात लोकप्रिय कॅरेट मूल्ये 24, 22, 18 आणि 14 आहेत. शुद्ध सोने 24k मानले जाते, ज्यामध्ये 99.9% सोने असते, तर उर्वरित कॅरेटमध्ये तांबे किंवा चांदीसारख्या मिश्र धातुंचा समावेश होतो.

22 कॅरेट सोने, चांदी, निकेल, जस्त आणि तांबे यासह इतर मिश्रधातूंचे दोन भाग एकत्रित करणारे सोन्याचे मिश्रण आहे. 22 कॅरेट सोने हे 24 कॅरेट सोन्यानंतरचे सर्वोत्तम दर्जाचे आहे. तर, 24 कॅरेट सोने हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ग्राहकांना किंवा ज्वेलर्ससाठी उपलब्ध असलेले सर्वात शुद्ध सोने आहे. 24-कॅरेट सोन्यामध्ये तांबे, निकेल, जस्त किंवा चांदी यांसारख्या मिश्र धातुंसह 99.99% सोने असते.

    follow whatsapp