Gopichand Padalkar : इंदापुरात आमदार पडळकरांवर भिरकावल्या चप्पला; भुजबळ भडकले

भागवत हिरेकर

10 Dec 2023 (अपडेटेड: 10 Dec 2023, 04:50 AM)

Gopichand Padalkar : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर इंदापुरात मराठा आंदोलकांनी चप्पलफेक केली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

Maratha Protesters threw chappal on mlc gopichand padalkar

Maratha Protesters threw chappal on mlc gopichand padalkar

follow google news

Gopichand Padalkar News Chhagan Bhujbal : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर इंदापूरमध्ये चप्पला फेकण्यात आल्या. अचानक घडलेल्या घटनेने पोलिसही गांगरून गेले. त्यांनी वेळीच पडळकरांना घटनास्थळावरून दूर नेले. दरम्यान, या घटनेनंतर कॅबिनेटमंत्री छगन भुजबळ हे चांगलेच भडकले. “ही दादागिरी थांबली नाही, तर याला आम्ही जशास तसे उत्तर देऊ”, असा इशारा भुजबळांनी दिला.

हे वाचलं का?

इंदापूर जिल्ह्यात शनिवारी (९ डिसेंबर) ओबीसी महाएल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे उपस्थित होते. मेळावा आटोपल्यानंतर गोपीचंद पडळकर एका आंदोलनाच्या ठिकाणी गेले होते. त्याचवेळी पडळकरांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या दिशेने चप्पला भिरकावण्यात आल्या.

गोपीचंद पडळकरांवर चप्पलफेक होण्याआधी नेमकं काय घडलं?

इंदापूरमध्ये मागील ४७ दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. तिथेच बाजूला दूध दर वाढीसाठी उपोषण सुरू आहे. या उपोषणकर्त्यांची भेट घेण्यासाठी गोपीचंद पडळकर आले होते. त्याचवेळी मराठा आंदोलकांनी पडळकर गो बॅक अशा घोषणा द्यायला सुरूवात केली.

हेही वाचा >> ‘शिंदेंनी नेतृत्वाच्या पाठीत खंजीर खुपसून आव्हान दिलं?’, सुनावणीत काय घडलं?

गोपीचंद पडळकर यांच्यासोबत आलेले कार्यकर्ते आणि मराठा आंदोलक यांच्यामध्ये बाचाबाची झाली. दरम्यान, काहींनी पडळकरांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. पडळकरांविरुद्ध घोषणाबाजी करत काही जणांनी गोपीचंद पडळकरांवर चप्पला भिरकावल्या.

छगन भुजबळांनी काय दिला इशारा?

गोपीचंद पडळकरांवर झालेल्या चप्पलफेक प्रकरणावर छगन भुजबळ यांनी संताप व्यक्त केला. देवेंद्र फडणवीस यांचं लक्ष वेधून घेत भुजबळांनी म्हटलं आहे की, “आमचा मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही, विरोध आहे तो झुंडशाहीला व दादागिरीला! ”

हेही वाचा >> “काय हे दादा? तुम्ही तर आमच्या इज्जतीचा…”, ठाकरेंचं फडणवीसांच्या वर्मावर बोट

“आज विधानपरिषद सदस्य गोपीचंदजी पडळकर यांच्यावर काही समाजकंटक लोकांनी विकृती दाखवून व लोकशाही पायदळी तुडवून हल्ला केल्याची बातमी समजली! या घटनेचा आम्ही सर्वजण तीव्र निषेध करतो! मी आजही इंदापूर येथे जाहीर सभेत सांगितल आहे की ही दादागिरी थांबली नाही तर याला आम्ही जशास तसे उत्तर देऊ!”, असा गर्भित इशारा भुजबळांनी दिला आहे.

दरम्यान, मराठा आरक्षण मुद्द्यावरून राज्यातील वातावरण तापलं आहे. छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यात वाक् युद्ध सुरू आहे. दोन्ही बाजूने एकमेकांवर टीका होत असून, पडळकर हे भुजबळांसोबत व्यासपीठावर दिसत आहे. त्यामुळे मराठा समाजातून ही प्रतिक्रिया उमटल्याचे म्हटले जात आहे.

    follow whatsapp