Govt Job : NPCIL मध्ये नोकरीची संधी! इच्छुक उमेदवारांनी लगेच करा अर्ज

रोहिणी ठोंबरे

27 Aug 2024 (अपडेटेड: 27 Aug 2024, 03:17 PM)

Recruitment 2024 : न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये (NPCIL) मेगा भरती होत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 11 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. परीक्षेबाबतची माहिती नंतर कळविण्यात येईल.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये (NPCIL) मेगा भरती होत आहे.

point

पात्र आणि इच्छुक उमेदवार, 11 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.

point

परीक्षेबाबतची माहिती नंतर कळविण्यात येईल.

NPCIL Recruitment 2024 : न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये (NPCIL) मेगा भरती होत आहे. कॅटेगरी II-स्टायपेंडरी ट्रेनी (ST/TN) ऑपरेटर पदासाठी 153 जागा, कॅटेगरी II-स्टायपेंडरी ट्रेनी (ST/TN) मेंटेनर या पदासाठी 126 जागा अशा एकूण 279 जागांवर ही नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 11 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. परीक्षेबाबतची माहिती नंतर कळविण्यात येईल. नोकरीचे ठिकाण रावतभाटा राजस्थान साइट, NPCIL आहे. (Govt Job opportunity 2024 in NPCIL Interested candidates apply immediately now)

हे वाचलं का?

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, 

  • पद क्र.1- 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Physics, Chemistry and Mathematics)
  • पद क्र.2- 1) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण 2) ITI (Electrician/ Fitter/ Instrumentation/ Electronics/Machinist/Turner/Welder) असणे आवश्यक आहे.

हेही वाचा : Mazi Ladki Bahin Yojana: काय म्हणता.. लाडकी बहीणमुळे महिला होणार कोट्याधीश? फक्त 'ते' पैसे...

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 24 वर्षांपर्यंत  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] असणे आवश्यक आहे.

शुल्क

  • या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ इडब्ल्यूएस कॅटेगरीतील उमेदवारांकडून 100 रूपये शुल्क आकारले जात आहे. 
  • तर, एससी/ एसटी/ इएक्सएसएम/ पीडब्ल्यूडी/ महिला कॅटेगरीतील उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. 

अधिक माहितीसाठी न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट https://www.npcil.nic.in/index.aspx वरून माहिती मिळवू शकता.

हेही वाचा : Sanjay Raut: 'मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, शिवरायांचा असा अपमान मुघलांनीही केला नाही', संजय राऊत संतापले!

अर्जाची लिंक

https://npcilcareers.co.in/RAPSST20242208/candidate/Default.aspx

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/1TWm3uw91TqqM79YRNyOnOBd-Sqr8ixjn/view?usp=sharing

    follow whatsapp