Dalit youth beaten from his ex boss: मोरबी (गुजरात): गुजरातमधील मोरबी जिल्ह्यात एका दलित तरुणाला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. 15 दिवसांच्या थकीत पगाराची मागणी केली असता कंपनीचा मालक आणि 11 जणांनी मारहाण केल्याचे पीडितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यांनी त्याच्या तोंडात चप्पल टाकली आणि त्याला माफी मागायला लावली. याप्रकरणी मोरबीचे डीएसपी पी.ए. झाला यांनी सांगितले की, पोलिसांनी आरोपीच्या घरावर धाड टाकली. पण तिथे कोणीही सापडलं नाही. आरोपींच्या अटकेसाठी तीन पथके तयार करण्यात आली असून ते आरोपींचा शोध घेत आहेत. (gujarat crime dalit youth beaten from his ex boss and his sister for asking salary)
ADVERTISEMENT
वास्तविक, मोरबी येथील एका तरुणाने ऑनलाइन एफआयआर दाखल केला आहे. त्यात त्याने म्हटले आहे की, तो राणीबा इंडस्ट्रीजच्या एक्स विभागात काम करायचा. त्याला 2 ऑक्टोबर रोजी कामावर घेण्यात आलं होतं. पण 18 ऑक्टोबर रोजी त्याला कामावरून काढून टाकण्यात आलं. कंपनी दर 5 तारखेला सर्व कर्मचाऱ्यांना पगार देते. त्यामुळे त्या तारखेची त्याने वाट पाहिली. पगार न आल्याने 6 नोव्हेंबरला त्याने कंपनी मालक विभूती पटेल यांना फोन करून याबाबत माहिती दिली.
हे ही वाचा >> NCP : ”दादा, दादा करत तुमचं…”, अजित पवारांच्या खासदाराने सुप्रिया सुळेंना डिवचलं
मालकाने केली तरुणाला मारहाण
यावर ती म्हणाली की मी पाहते आणि सांगते. त्यानंतरही कंपनीकडून कोणतीही माहिती दिली नाही. एके दिवशी ओम पटेल याने फोन करून तरुणाला धमकावले आणि बहिणीला फोन करून त्रास का देतो?, असा सवालही केला. तसेच पगार दिला जाणार नसल्याचेही त्याने सांगितले. पुन्हा असंही बजावलं की, आतापासून बहिणीला फोन करू नको
हे ही वाचा >> महाराष्ट्र हादरला.. 17 वर्षीय मुलाचा अडीच वर्षाच्या चिमुकलीवर पाशवी बलात्कार, नंतर..
पगार मिळालेला नसल्याने पीडित तरुण हा आपला भाऊ आणि शेजाऱ्यासह राणीबा इंडस्ट्रीजच्या कार्यालयात गेला. त्यावेळेस तरुणाने ओम पटेलला फोन केला. तेव्हा आरोपी ओम पटेल यांनी आपण तिथे थोड्याच वेळात येत असल्याचं सांगितलं. त्यानंतर रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास ओम त्याच्या काही लोकांसह तेथे पोहोचला आणि तरुणाला मारहाण करुन निघून गेला. यानंतर कंपनी मॅनेजर परीक्षित आणि कंपनीतील इतर 6 जणांनी मिळून तरुणाला लिफ्टमध्ये ओढलं आणि बेदम मारहाण केली यावेळी चप्पलही त्याच्या तोंडात कोंबण्यात आली.
‘धमकावलं अन् शूट केला माफी मागणारा व्हिडीओ’
यावेळी या सगळ्यांनीच त्याला जातीवाचक शिवीगाळ देखील केली. एवढेच नाही तर त्याला बाजूला घेऊन माफी मागणारा व्हिडिओ देखील शूट केला. यामध्ये त्याने (पीडित) व त्याच्या मित्राने खंडणी मागितल्याचे सांगण्यास भाग पाडले. परत कधीही फोन करून पैसे मागणार नाही असंही पीडिताकडून वदवून घेतलं. यानंतर पुन्हा विभूती, ओम आणि राज पटेल यांनी मिळून त्याला बेल्टने मारहाण केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे..
ADVERTISEMENT