मुंबई: मुसळधार पावसाने मुंबई (Mumbai) आणि उपनगरात अक्षरश: कहर केला आहे. मुंबईनजीकच्या ठाणे (Thane) जिल्ह्यातील कल्याण (Kalyan) ते कर्जत, कसारापर्यंत सध्या तुफान पाऊस सुरू आहे. यामुळे मुंबईची लाइफलाइन समजली जाणारी लोकल सेवा ठप्प झाली आहे. कल्याण स्थानक परिसरासह मुख्य बाजारपेठ आणि रस्त्यांवर बरंच पाणी साचलं आहे. कल्याणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गुडघाभर पाणी आहे. सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाल्याने वाहतुकीवरही मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. त्याचबरोबर पाणी साचल्याने वाहनचालक व प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. (heavy rains disrupted local train services mumbai thane dombivli to karjat kasara routes completely closed no local train has been able to run today news maharashtra marathi)
ADVERTISEMENT
अंबरनाथ-बदलापूर रेल्वे रूळ पाण्याखाली
गेल्या 24 तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. अंबरनाथ (Ambarnath) पूर्व भागातील मुख्य नाला धोकादायक अवस्थेत असल्याने या नाल्याने रेल्वे रुळही बुजविला आहे. या नाल्याचा पाण्याचा प्रवाह एवढा वेगवान होता की, अंबरनाथ आणि बदलापूर (Badlapur) या दोन रेल्वे स्थानकांदरम्यानच्या रेल्वे रुळाखालील खडी देखील वाहून गेली. त्यामुळे आता या रेल्वे मार्गाला धोका निर्माण झाल्याने येथील अप आणि डाऊन रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
आज (19 जुलै) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अंबरनाथ शहरातील सर्व नदी नाल्यांना उधाण आले आणि या नाल्याचे पाणी रेल्वे रुळावर आले. या पाण्याच्या प्रवाहात रेल्वे ट्रॅक पूर्णपणे बुडाला होता. सुरुवातीला अर्धा तास रेल्वेसेवा बंद ठेवण्यात आली होती. मात्र, त्यानंतर पुरामुळे मुंबईच्या दिशेने एक लोकल सोडण्यात आली. ही लोकल गेल्यानंतर अप आणि डाऊन दिशेने एकही लोकल सोडण्यात आलेली नाही. अंबरनाथच्या बी केबिन परिसराजवळील रेल्वे रुळाखालील खडी वाहून गेल्याने रेल्वेमार्ग धोकादायक बनला आहे.
हे ही वाचा >> Kirit Somaiya यांचा आक्षेपार्ह Video, जितेंद्र आव्हाडांच्या मुलीचं ‘ते’ ट्वीट प्रचंड चर्चेत
सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत एकही लोकल किंवा एक्स्प्रेस या मार्गावरुन गाडी सोडण्यात आलेली नाही. रेल्वे रुळाखाली घसरलेली खडी पूर्ववत करण्यासाठी 30 ते 40 कामगारांनाही पाचारण करण्यात आले होते, मात्र पावसाचा जोर कमी न झाल्याने या कामगारांनाही पाऊस थांबण्याची वाट पहावी लागत आहे. रेल्वे रुळाखालील संपूर्ण खडी नाल्यात वाहून गेली आहे. त्यामुळे अधिकारी या रेल्वे रुळाखालील पाण्याची पातळीही तपासून युद्धपातळीवर रेल्वे सेवा पूर्ववत करण्याचा प्रयत्न करत आहेत.
हे ही वाचा >> Seema Haider : बॉर्डरवर मेकअप, मुलांना बोलण्याची ट्रेनिंग, सीमाच्या चौकशीत IBचे गंभीर खुलासे
मात्र, गेल्या तीन तासांपासून रेल्वेसेवा पूर्णपणे ठप्प असल्याने प्रवाशांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागत आहे. रेल्वे रुळावर पाणी साचल्याचा प्रकार अंबरनाथमधील मोरिवली गाव परिसरातही घडला असून त्या ठिकाणीही नाले तुंबल्याने सर्व पाणी रेल्वे रुळावर आले आहे.
ADVERTISEMENT