CM Eknath Shinde Land: मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या महाराष्ट्रातील सर्वात चर्चेत असणार नावं आहे. शिवसेनेत केलेलं बंड.. मुख्यमंत्री पद आणि शिवसेना पक्षच स्वत:कडे राखणारं नेतृत्व अशी अत्यंत चर्चेत राहणारी कामगिरी त्यांनी गेल्या दीड वर्षात केली आहे. मुख्यमंत्री असतानाही कार्यकर्ता आणि शेतकरी ही त्यांनी आपली ओळख जपण्याचा देखील प्रयत्न केला आहे. (how much land does cm eknath shinde have see whos name is on the satbara utara)
ADVERTISEMENT
खरं तर एकनाथ शिंदे यांची बहुतांश कारकीर्द आणि राजकीय जडणघडण ही ठाण्यातच झाली. शिवसेनेचे तडफदार नेते स्वर्गीय आनंद दिघे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत आपला ठसा उमटवणारे एकनाथ शिंदे हे मूळचे सातारा जिल्ह्यातील दरे तांब या गावातील आहेत.
कोयनेच्या पात्राजवळील हे गाव आहे. तसं पाहिल्यास हे गाव पाण्याचा दृष्टीने अत्यंत समृद्ध आहे. प्रचंड पर्जन्यवृष्टी आणि कोयनेसारखी जलवाहिनी ही या गावासाठी एक वरदानच ठरली आहे. त्यामुळेच येथे शेतीसाठी अत्यंत सुपीक अशी जमीन आहे. त्यामुळे इथे शेती करण्याचा मोह स्वत: मुख्यमंत्री महोदयांना देखील रोखता येत नाही.
हे ही वाचा>> ‘पळून गेलेले सगळे लोकशाहीद्रोही’, नार्वेकरांच्या निकालावर सरोदेंचं कायदेशीर स्पष्टीकरण
आपल्या व्यस्त कार्यक्रमातून दोन-तीन दिवसांचा वेळ काढून मुख्यमंत्री शिंदे हे दरे या आपल्या गावी तीन-चार महिन्यातून एकदा तरी चक्कर टाकताच. यावेळी ते आपल्या शेतीत रमतात, तेथील कामं करतात.. हे आपल्याला अनेकदा त्यांनीच सोशल मीडियावर अपलोड केलेल्या फोटो आणि व्हीडिओमधून पाहायला मिळतं.
यावरून अनेकदा त्यांना विरोधक ट्रोल देखील करतात. मात्र, असं असलं तरीही आपल्या शेतीत जाणं हे अद्यापही मुख्यमंत्र्यांनी जपलं आहे. पण ज्या शेतीत मुख्यमंत्री शिंदे हे जात असतात ती शेती नेमकी कोणाची आहे.. त्याच्या सातबारावर नावं कोणाची आहेत. याबाबत आपल्याला नक्कीच उत्सुकता असेल. याचबाबत आता नेमकी माहिती आम्ही आपल्याला सांगणार आहोत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावावर नेमकी किती जमीन?
एकनाथ शिंदे हे सुरुवातीपासूनच ठाण्यातील बढं प्रस्थ म्हणून ओळखलं जात होतं. आमदारकीच्या पहिल्या टर्मपासूनच त्यांनी ठाण्यात आपला दबदबा निर्माण केला होता. त्यानंतर हळूहळू त्यांनी ठाणे जिल्ह्यासह संपूर्ण पक्षावरच आपली पकड निर्माण केली. असं असताना दुसरीकडे त्यांच्या संपत्तीत देखील वाढ होत गेली.
2009 विधानसभा निवडणुकीवेळी एकनाथ शिंदेंनी निवडणूक आयोगाकडे जे प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं त्यात त्यांच्याकडे कोणतीही जमीन नसल्याचं नमूद केलं होतं. मात्र, 2019 साली त्यांनी जे प्रतिज्ञापत्र निवडणुकीच्या वेळेस सादर केलं. त्यात 2018 साली त्यांनी 5 हेक्टर 12.45 एकर जमीन खरेदी केल्याचं जाहीर केलं होतं. जी त्यांनी 21 लाख रुपयांना खरेदी केल्याचं प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. ही सगळी जमीन त्यांनी दरे या आपल्या गावी खरेदी केल्याचं प्रतिज्ञापत्रातून समजतं आहे.
हे ही वाचा>> Shiv Sena UBT: एकनाथ शिंदे स्टेजवरच पडलेले ठाकरेंच्या पाया, ‘तो’ Video दाखवला अन्…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह सात-बारावर कोणाकोणाची नावं?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दरे या गावी जी काही एकूण जमीन आहे ती त्यांच्या एकट्याच्या मालकीची नसल्याचं समजतं आहे. कारण याच गावातील चार वेगवेगळ्या जागांचे सात-बारा उतारे हे समोर आले आहेत. त्यामध्ये एकनाथ शिंदे यांचं एकट्याचं नाव नसल्याचं समोर आलं आहे.
एकनाथ शिंदे यांचं एकूण 4 जागांच्या सात-बारावर नाव आहे. मात्र याशिवाय आणखी तीन जणांची नावं देखील या सात-बारावर आहेत. तसेच या चारही सातबारा उताऱ्यावर एकनाथ शिंदे यांच्या मातोश्री गंगूबाई शिंदे यांचं नाव देखील होतं. मात्र, त्यांचं निधन झालं असल्याने ते नाव उताऱ्यावरून वगळण्यात आलं आहे.
त्यामुळे आता सातबारा उताऱ्यावर एकूण चार जणांची नावं आहेत. त्यापैकी पहिलं नाव हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आहे. तर दुसरं नाव सुभाष संभाजी शिंदे, तिसरं नाव प्रकाश संभाजी शिंदे आणि चौथं नाव हे सुनिता साळुंखे यांचं आहे.
ADVERTISEMENT