IAS Pooja Khedkar Father: वादग्रस्त कारकीर्द, 40 कोटींची संपत्ती... IAS पूजा खेडकरांचे वडील आहेत तरी कोण?

रोहिणी ठोंबरे

11 Jul 2024 (अपडेटेड: 11 Jul 2024, 12:23 PM)

IAS Pooja Khedkar Controversy : गेल्या काही दिवसांपासून पुणे येथील प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) त्यांच्या वादग्रस्त वर्तवणुकीमुळे प्रचंड चर्चेत आहेत. प्रोबेशन काळात नियमबाह्या मागण्या केल्यामुळे पूजा खेडकर वादात सापडल्या आहेत.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

IAS पूजा खेडकर यांचे वडील आहेत तरी कोण?

point

वडिलांच्या संपत्तीमुळे प्रकरणाला नवं वळण 

point

IAS पूजा खेडकर यांचे वादग्रस्त प्रकरण काय?

Who is IAS Pooja Khedkar's Father : गेल्या काही दिवसांपासून पुणे येथील प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) त्यांच्या वादग्रस्त वर्तवणुकीमुळे प्रचंड चर्चेत आहेत. प्रोबेशन काळात नियमबाह्या मागण्या केल्यामुळे पूजा खेडकर वादात सापडल्या आहेत. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी पूजा यांच्याविरोधात तक्रार केली होती. पण खेडकर कुटुंबासाठी हे काही नवीन नाही. याआधी पूजा यांच्या वडीलांवरही गंभीर आरोप झाले आहे. ते नेमके कोण आहेत? याविषयी सविस्तर आपण या बातमीतून  जाणून घेऊयात. (IAS pooja khedkar controversy details and about father dilip khedkar she lie of her disability for upsc selection )

हे वाचलं का?

IAS पूजा खेडकर यांचे वडील आहेत तरी कोण?

IAS पूजा खेडकर यांच्या वडीलांचे नाव दिलीप खेडकर आहे. B.E (मेकॅनिकल) शिक्षण झालेले दिलीप खेडकर माजी सनदी अधिकारी आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील भालगाव हे त्यांचे मूळ गाव आहे. दिलीप खेडकरांना पियुष खेडकर आणि डॉ. पूजा खेडकर अशी दोन अपत्य आहेत. पियुष खेडकर हा लंडनमध्ये शिक्षण घेत आहे तर पूजा खेडकर 2023 बॅचच्या IAS अधिकारी आहेत. दिलीप खेडकरांनी निवृत्त होताच राजकारणात नशीब आजमावले.

हेही वाचा : Mumbai Weather Update: मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता; असा आहे हवामान विभागाचा अंदाज

लोकसभा निवडणूक 2024 मध्ये त्यांनी अहमदनगर मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांना 13 हजार 749 मते मिळाली. पण, या प्रकरणात चर्चा होतेय ती त्यांच्या संपत्तीची... प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे 40 कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यामुळे IAS पूजा खेडकर यांच्या प्रकरणाला एक वेगळंच वळण आलं आहे. 

वडिलांच्या संपत्तीमुळे प्रकरणाला नवं वळण 

सनदी अधिकाऱ्याकडे एवढी संपत्ती कशी असू शकते?, दिलीप खेडकरांकडे 40 कोटींची संपत्ती आहे, तर त्यांची मुलगी पूजा ही ओबीसींच्या नॉन क्रिमी लेयरमध्ये कशी येते? अशाप्रकारचे प्रश्न उपस्थित होत आहे. यासर्वात विशेष बाब म्हणजे माजी सनदी दिलीप खेडकर यांच्या पत्नी डॉ. मनोरमा खेडकर यांनी देखील लोकसभा निवडणूक अर्ज भरला होता. त्या भालगावच्या लोकनियुक्त माजी सरपंच होत्या. त्याचबरोबर मनोरमा खेडकर यांचे वडील जगन्नाथ बुधवंत हे देखील माजी सनदी अधिकारी होते. त्यांची कारकीर्द देखील वादग्रस्त होती. त्यांचे निलंबनही झाले होते.  

हेही वाचा : Mumbai Weather Update: मुंबई, महाराष्ट्रातील पावसाचा नेमका अंदाज, पुढील 24 तासात कुठे-कुठे बरसणार?

 

IAS पूजा खेडकर यांचे वादग्रस्त प्रकरण काय?

देशात दरवर्षी लाखो विद्यार्थी UPSC ची तयारी करतात, मात्र मोजक्याच मुलांची निवड होते. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्याला नाव, मान-सन्मान इत्यादी सर्व सुखसोयी मिळतात. पण, महाराष्ट्र केडरच्या 2023 बॅचच्या प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर या त्यांच्या अतिरिक्त मागण्यांमुळे अडचणीत सापडल्या आहेत. त्यांची पुण्यातून वाशीम येथे बदली करण्यात आली आहे. 

नवीन अहवालानुसार, पूजा खेडकर यांनी व्हिज्युअली इम्पेअर्ड आणि मेंटल इलनेस असल्याची सर्टिफिकेट सादर करून UPSC ची परीक्षा दिली होती. त्याआधारे विशेष सवलत मिळवून त्या आयएएस झाल्या. त्यांना जर ही सवलत मिळाली नसती तर जितके गुण त्यांना मिळाले आहेत त्यात त्यांना IAS पद मिळणे अशक्य होते. 

हेही वाचा : Vidhan Parishad Election: कोणाचे आमदार कुठल्या हॉटेलमध्ये, महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?

 

त्याचबरोबर निवड झाल्यानंतर, पूजा खेडकर यांची वैद्यकीय तपासणी होणार होती, परंतु त्यांनी टाळाटाळ केली. वेगवेगळ्या कारणांमुळे त्यांनी सहा वेळा वैद्यकीय चाचण्या करण्यास नकार दिला. तसेच, बाहेरच्या वैद्यकीय एजन्सीकडून एमआरआय अहवाल सादर करणे निवडले, जे UPSC ने स्वीकारण्यास नकार दिला. मात्र, नंतर यूपीएससीने हा अहवाल स्वीकारला. यामुळे सरकारने याबाबत चौकशी करावी अशी मागणी केली जात आहे.

    follow whatsapp